शिव मंदिर
पालघर-माहीम-रेवाळे रस्त्यावर एसटी बसच्या माहीम बाजार बसथांब्यावर डाव्या बाजूस हे देऊळ आहे. पालघरवरून रेवाळे, केळवे, सफाळे, एडवण, कोरे, दातिवरे, मथाणे, वेढी, चटाळे, उसरणी, भादवे, माकुणसार वगैरे ठिकाणी जाणाऱ्या सर्व एसटी बसेस तसेच सातपाटीवरून एडवणकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षा येथे थांबतात. पालघरहून ऑटोरिक्षाने तसेच खाजगी टांग्याने तेथे जाता येते.
मंदिराच्या समोर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर [ संदर्भ हवा ] ह्यांनी बांधलेला, वर्षभर पाणीसाठा असणारा व दोन्ही बाजूंनी पायऱ्या असलेला दगडी तलाव आहे. तलावात मध्यवर्ती भागात एक लाकडी खांब आहे. महाशिवरात्री, दीपावली, गुढी पाडवा इत्यादी महोत्सवांत दीप प्रज्वलन करण्यासाठी तलावाच्या चारही भिंतीना आतून कोनाड्यांची सोय केली आहे.
संदर्भ
[संपादन]१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html