Jump to content

वॉटरगेट कुभांड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वॉटरगेट प्रकरण या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉटरगेट कुभांड हे अमेरिकेमध्ये १९७२ ते १९७४ मध्ये उघडकीस आलेले राजकीय कुभांड होते. वॉशिंग्टन डी.सी. येथील वॉटरगेट कार्यालय संकुलात असलेल्या अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयातून गोपनीय माहिती मिळविण्यासाठी काही चोरांनी कार्यालये फोडली व तेथून माहिती पळवली. तत्कालीन रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड एम. निक्सन व त्याच्या सहकाऱ्यांनी यामागील आपला हात लपवण्याचे अतोनात प्रयत्न केले परंतु शेवटी हे उघडकीस आलेच. आपला सहभाग उघड होत असल्याचे पाहून निक्सनने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याचा उपराष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला व त्याने निक्सनला माफी दिली.