वूस्टर (मॅसेच्युसेट्स)
Appearance
वूस्टरशायर याच्याशी गल्लत करू नका.
वूस्टर हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील प्रमुख शहर आहे. बॉस्टनच्या पश्चिमेस ६४ किमी (४० मैल) असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,८१,०४५ इतकी होती.
पॅकोचोआग या येथील स्थानिक रहिवाशांनी या जागेचे नाव क्विन्सिगामोंड असे ठेवलेले होते. इ.स. १६७३मध्ये इंग्लिश लोकांनी येथे पहिली युरोपीय वस्ती केली. ही सहा-सात घरांची वस्ती डिसेंबर २, इ.स. १६७५ रोजी जळितात भस्मसात झाली व तेथील रहिवासी मारले गेले किंवा पळून गेले. इ.स. १६८४मध्ये येथे पुन्हा कायमस्वरुपी वस्ती झाली.