रॉय डिझ्नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रॉय डिस्नी या पानावरून पुनर्निर्देशित)

रॉय ऑलिव्हर डिस्नी (२४ जून, इ.स. १८९३:शिकागो, अमेरिका - २० डिसेंबर, इ.स. १९७१[१]) हा एक अमेरिकन उद्योजक होता. याने आपला भाऊ वॉल्ट डिस्नीसोबत वॉल्ट डिस्नी कंपनीची स्थापना केली.

कौटुंबिक माहिती व बालपण[संपादन]

रॉय डिस्नी एलियास डिस्नी आणि फ्लोरा कॉल डिस्नी यांचा मोठा मुलगा होता. अठराव्या वर्षी रॉयने कॅन्सस सिटी स्टार या वर्तमानपत्रकंपनीची दैनिके टाकण्याचा व्यवसाय विकत घेतला. कॅन्सस सिटीमधील २७वी गल्ली ते ३१वी गल्ली व प्रॉस्पेक्ट ॲव्हेन्यू ते इंडियाना ॲव्हेन्यू या भागात वर्तमानपत्र पोहचविण्याचा त्यांना अधिकार होता. ते सकाळी कॅन्सस सिटी टाइम्सच्या ७०० तर संध्याकाळी कॅन्सस सिटी स्टारच्या ६०० प्रती पोचवीत.[२]

१९१२मध्ये रॉय मॅन्युअल ट्रेनिंग हायस्कूलमधून उत्तीर्ण झाल्यावर त्याने आपला वर्तमानपत्र व्यवसाय सोडला व उन्हाळ्यात एका शेतावर काम केले. त्यानंतर त्याने फर्स्ट नॅशनल बँक ऑफ कॅन्सस सिटीमध्ये लेखनिकाची नोकरी केली.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ जेन्स, Jack (December 21, 1971). "Roy O. Disney". लॉस एंजेलस टाइम्स. September 24, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ a b Barrier (2007), p. 18-19