"तुकडोजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो शुद्धलेखन, {{संत}}, {{विस्तार}},
छो {{संत}} -> {{माहितीचौकट संत}}
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


{{संत|
{{माहितीचौकट संत|
चित्र =
चित्र =
|पूर्ण नाव = माणिक बंडोजी इंगळे
|पूर्ण नाव = माणिक बंडोजी इंगळे

१४:५४, २५ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती


तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.

तुकडोजी महाराजा म्हणतात-

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती। 
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।

संत तुकडोजी महाराज यांनी अनेक कविता लिहील्या. त्यातीलच ही एक.

या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥