Jump to content

विकिपीडिया:सदस्य योगदानाची प्रताधिकार भंगासाठी तपासणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुचना

[संपादन]

हे पान मराठी विकिवर होत असलेल्या प्रताधिकार भंगाची तपासणी करण्यासाठी आणि तो नोंदवण्यासाठी आहे. अलिकडच्या बदलांवर लक्ष ठेऊन तसेही अनेक सजग सदस्य प्रताधिकार भंग रोखण्यास हातभार लावत असतातच. तरीही, काही सदस्यांनी त्यांच्या संपादन इतिहासात मोठ्या प्रमाणावर प्रताधिकार भंग केल्याचे लक्षात आल्यास व ते मान्य करण्यास प्रबळ पुरावे असतील तर आपण ह्या तपासणीची विनंती करू शकता. त्या विनंतीवर ह्या पानाचे उपपान म्हणून त्या विशिष्ट सदस्याच्या योगदानांची तपासणी प्रताधिकार भंगासाठी केली जाईल. या व्यतिरिक्त सापडलेल्या प्रत्येक प्रताधिकार भंगाची नोंद ते करणाऱ्या सदस्याच्या नावाने उपपान करून त्यामधे केली जाईल जेणेकरून त्या विशिष्ट सदस्याने केलेल्या प्रताधिकार भंगाची एका ठिकाणी यादी होत राहील.

  • तपासणीसाठी त्या सदस्याच्या योगदानाची उतरत्या क्रमाने मांडणी करणारे उपपान तयार (XXXX यांची प्रताधिकार भंगासाठी तपासणी) केले जाईल.
  • त्यातील एक एजार केबी पेक्षा मोठी सर्व योगदान प्रताधिकार भंगासाठी तपासले जाईल.
  • प्रत्येक तपासलेल्या पानांना जर प्रताधिकार भंग सिद्ध होत असेल तर साचा:प्रताधिकारित_मजकूर_शंका हा साचा लावून प्रताधिकार होत असलेला मजकूर झाकून टाकून प्रचालकांना पुढील कारवाईसाठी साद दिली जाईल.

सध्या चालू असलेली तपासणी (दीर्घकाळ नकल-डकव करणारे सदस्य)

[संपादन]

प्रताधिकार भंग सिद्ध होऊन कारवाई झालेल्या पानांची सदस्यानुसार यादी

[संपादन]

आपण कशाप्रकारे योगदान देऊ शकता?

[संपादन]
  • संपादन इतिहासात स्वत: कधीच प्रताधिकार भंग केला नसलेले कोणीही सदस्य ह्या तपासणीमधे सहभागी होऊ शकतात.
  • ज्यांचा तपास चालू आहे, ते स्वत: आपला प्रताधिकार भंग काढून टाकू शकतात. येथील अहवालाची मदत त्यांना नक्कीच होऊ शकते.