वाळवी
लाकुड कोरून खाणारे हे कीटक उधई या नावानेही ओळखले जातात. या किटकांना संस्कृत भाषेत वल्म तर इंग्रजी मध्ये टर्माइट असे म्हंटले जाते. भारतात सर्वत्र वाळवी आढळते. वाळवी हा कीटक वसाहत करून लाकडा मध्ये राहतो. दमट जागा जुन्या लाकडामध्ये वाळवीचे अस्तित्त्व असते. वाळवी ही कीड खोडाची कोवळी साल कुरतडून खाते. फॉरमोसॅन सबटेरानियन टर्माईट' या नावाने ओळखली जाणारी आशियातील वाळवीची जात वेगाने लाकुड खाते. या उपद्रवी कीटकांमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. कीटकांना पंखांच्या दोन जोड्या असतात. वाळवीचा खाद्य म्हणूनही वापर केला जातो. ही अतिशय पौष्टिक असते.
इतिहास
[संपादन]वराहमिहिराने बृहत संहितेत विहिर खणायची असेल तर वाळवीचं वारूळ असलेली जागा शोधून काढा असा सल्ला दिला आहे.
प्रादुर्भाव
[संपादन]वाळवीची वसाहत पूर्ण झाली की त्यातील राणीमाशी उडून जाते. आपले पंख काढून टाकते. नंतर ती आणखी वसाहत तयार करण्याच्या उद्देशाने प्रजननासाठी नवीन ठिकाण शोधते व तेथे कार्य सुरू करते.
उपाय
[संपादन]शेतातील वाळवीची वारुळे खोदून त्यातील राणी वाळवी नष्ट करावी. असे केल्याने पुढील पीढी येत नाही. तसेच वारुळात मिथाईल ब्रोमाईड व क्लोरोफॉर्म यांचे २५० मि.लि. मिश्रण प्रति वारुळात ओतावे. यामुळे वाळवी तेथे राहत नाही. निंबोळीपेड टाकल्यास वाळवीला न आवडून तेथून ती जाण्याचा प्रयत्न करते. सरडा हे प्राणी वाळवी खातात.