Jump to content

वर्णमाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्णमाला:-

तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत भीविरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या सांकेतिक खुणेला ध्वनिचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण ५२ वर्ण आहेत. या वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.

अ, आ, ॲ, ऑ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः

क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ

मराठीत एकूण ५२ वर्ण आहेत.

स्वर

स्वरादी

व्यंजन

१. स्वर

[संपादन]

ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात. मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत. वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात:

ऱ्हस्व स्वर

दीर्घ स्वर

१. ऱ्हस्व स्वर: ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. उदा. अ, ॲ, इ, ऋ, उ

२. दीर्घ स्वर: ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदा. आ, ऑ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

स्वरांचे इतर प्रकार:

१. सजातीय स्वर: एकाच उच्चार स्थांनामधून जाणाऱ्या:स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-आ, ॲ-ऑ, उ-ऊ, ए-ऐ, ओ-औ,

२. विजातीय स्वर: भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-ई, उ-ए, ओ-ऋ

३. संयुक्त स्वर: दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त अथॆ स्वर असे म्हणतात. असे ४ स्वर आहेत.

ए – अ+इ/ई

ऐ – आ+इ/ई

ओ – अ+उ/ऊ

औ – आ+उ/ऊ

२. स्वरादी

[संपादन]

ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वर + आदी – स्वरादी दोन स्वरादी – अं, अः . स्वरादीमध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.

स्वरादीचे एकूण तीन प्रकार आहेत:

अनुस्वार

अनुनासिक

विसर्ग

क. अनुस्वार – स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा अथंवर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात. उदा. गंगा, चंचल इत्यादी.

ख. अनुनासिक – जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझरता होत असेल तेव्हा त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. उदा. घरांत, जेव्हां, फुफ्फुसांतील, आम्हांला, टपालहंशील, हंहंहं, हांहांहां, हूं का चूं, हुंकार, इत्यादी.

ग. विसर्ग – विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार होत असतांना स्वराच्या उच्चारानंतर ह-हा-हि-ही-हु-हू सारखा उच्चार होतांना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंबे देतात. मराठीत विसर्गयुक्त शब्द जवळजवळ नाहीत. (दुःख, कःपदार्थ ह्यांतली विसर्गसदृश चिन्हे विसर्ग नाहीत!) आहेत त्यांपैकी हे दोन :- उदा. स्वतः, मनःशाती, निःस्पृह, निःश्वास, निःशंक, इत्यादी.

३.व्यंजन

[संपादन]

एकूण व्यंजन ४१ आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.

व्यंजने पाच प्रकारची आहेत.

स्पर्श व्यंजन (३२)

अर्धस्वर व्यंजन (४)

उष्म, घर्षक व्यंजन (३)

महाप्राण व्यंजन (१)

स्वतंत्र व्यंजन (१)

जिव्हामूलीय उदा. दुःख:, कःपदार्थ: यांमधील विसर्गासारखे चिन्ह.

१. स्पर्श व्यंजन:

मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामुळे देवनागरीची मुळाक्षरे हीच मराठी मुळाक्षरे होतात. यात बारा स्वर आणि छत्तीस व्यंजने असतात.

  • स्वर

अ आ इ ई उ ऊ

ए ऐ ओ औ अं अः

  • विशेष स्वर - ॲ,‌ऑ

तसेच इतर चार देवनागरी स्वर काही ठिकाणी मराठीत पण वापरतात:

ऋ, ॠ, ऌ, ॡ.

  • व्यंजन

क ख ग घ ङ

च छ ज झ ञ

ट ठ ड ढ ण

त थ द ध न

प फ ब भ म

य र ल व

श ष स ह ळ

क्ष ज्ञ

  • विशेष - 'ङ' आणि 'ञ' चा उच्चार हा, 'ण' किंवा 'न' प्रमाणेच नासिक्य होतो. 'ङ' हा 'ड' नाही, तसेच 'ञ' हे 'त्र' नाही. उदाहरणार्थ- अङ्क=अंक, मञ्जुषा=मंजुषा.

हे पण पहा

[संपादन]

2009 मध्ये शासनाने वर्णमालेत 2 वेळा बदल केलेआहेत.

1) 2009 मध्ये 2 नवीन स्वर समाविष्ट केले.

ॲ आणि ऑ मराठी वर्णमालेत ॲ आणि ऑ या इंग्रजी स्वरांचा समावेश करावा असा विचार मांडला होते.

प्राध्यापक :- अरविंद गंगाधर मंगरूळकर