Jump to content

लिंक लाइट रेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लिंक लाइट रेल ही अमेरिकेच्या सिअ‍ॅटल शहर आणि परिसरातील रेल्वे वाहतूक आहे. ही जलद परिवहन सेवा तीन वेगवेगळ्या भागांत आहे. यांतील किंग काउंटीमधील १ लाइन (पूर्वीची सेंट्रल लिंक) हा २६ मैल (४२ किमी) लांबीचा मार्ग सिअ‍ॅटल आणि सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडतो. २ लाइन हा किंग काउंटीच्या पूर्व भागातील मार्ग बेलव्ह्यू आणि रेडमंड यांच्या मध्ये आहे तर टी लाइन (पूर्वीचा टॅकोमा लिंक मार्ग) हा ४ मैल (६.४ किमी) लांबीचा मार्ग पीयर्स काउंटीमध्ये टॅकोमा शहराच्या मध्यवर्ती भागापासून साउंडर रेल्वे मार्गावरील टॅकोमा डोम स्थानका दरम्यान धावतो. २०२३मध्ये लिंक लाइट रेलवर २ कोटी ३९ लोक प्रवाशांनी प्रवास केला होता. यातील बहुसंख्य प्रवासी १ लाइन वर होते. लिंक लाइट रेल वरील गाड्या दर ६ ते २४ मिनिटांनी धावतात.

२ लाइनचा पहिला टप्पा २७ एप्रिल, २०२४ रोजी साउथ बेलेव्ह्यू आणि रेडमंड टेक्नॉलॉजी स्थानकां दरम्यान सुरू झाला२०२५ पर्यंत हा मार्ग सिअ‍ॅटल आणि पूर्वेला रेडमंडच्या मध्यवर्ती भागापर्यंत विस्तारित केला जाईल. २०४४ पर्यंतच्या आराखड्यानुसार साउंड ट्रान्झिट लिंक लाइट रेल प्रणाली ११६ मैल (१८७ किमी) ची असेल आणि त्यावर ७० स्थानके असतील.Map

स्थानके

[संपादन]

२०२४मध्ये लिंक लाइट रेल वर ३९ स्थानके आहेत. यांपैकी १९ १ लाइनवर, ८ २ लाइनवर तर १२ टी लाइनवर आहेत.[][][][][]

२०२४मध्ये कार्यरत आणि बांधकामाधीन मार्ग आणि स्थानकांचा नकाशा
२ लाइनवरील रेडमंड टेक्नॉलॉजी स्थानक

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Transit Development Plan 2022–2027 and 2021 Annual Report" (PDF). Sound Transit. August 25, 2022. pp. 15–19. November 18, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). November 17, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Hilltop Tacoma Link Extension opens for passengers tomorrow" (Press release). Sound Transit. September 15, 2023. September 16, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Light rail opens on the Eastside". Sound Transit. April 27, 2024. April 27, 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Station Experience Design Guidelines" (PDF). Sound Transit. June 2022. pp. 32, 36–38, 64–65, 69. November 19, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). November 18, 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "Tacoma Link Expansion: Project Overview" (PDF). Sound Transit. July 2015. February 2, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). November 18, 2022 रोजी पाहिले.