लंडन आय
Appearance
लंडन आय (इंग्लिश: London Eye) हा लंडन शहरामधील एक अजस्त्र पाळणा (जायंट व्हील/फेरिस व्हील) आहे. थेम्स नदीच्या काठावरील लंडन आय हे युनायटेड किंग्डममधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ व लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते. येथे दरवर्षी सुमारे ३५ लाख पर्यटक भेट देतात.
१३५ मीटर उंचीचा हा पाळणा ३१ डिसेंबर १९९९ रोजी खुला करण्यात आला. ह्याच्या बांधकामासाठी सुमारे ७ कोटी पाउंड इतका खर्च आला.
गॅलरी
[संपादन]-
लंडन आयमध्ये ३२ अंडाकृती आकाराच्या कूप्या आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत