यू.जी. कृष्णमूर्ती
Appearance
यू.जी. कृष्णमूर्ती | |
पूर्ण नाव | उप्पालुरी गोपाल कृष्णमूर्ती |
कार्यक्षेत्र | अध्यात्म |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
उप्पालुरी गोपाल कृष्णमूर्ती (९ जुलै, इ.स. १९१८ - २२ मार्च, इ.स. २००७) हा बोधीला प्रश्नांकित करणारा भारतीय विचारवंत होता. व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यातील विचाराचे महत्त्व मान्य असूनही अंतिम वास्तवाच्या किंवा सत्याच्या संदर्भात त्याने विचारास आधार मानणे नाकारले आणि असे करताना विचारांच्या सर्व व्यवस्थांना आणि तत्त्वज्ञानांना नाकारले. यासंदर्भात त्याचे प्रसिद्ध विधान आहे : "त्यांना सांगा की समजून घेण्याजोगे काहीही नाही."
अनेकांनी त्याला बोधीप्राप्त मनुष्य मानले असले तरी कृष्णमूर्ती आपल्या अवस्थेचा निर्देश नेहमी "नैसर्गिक अवस्था" असा करीत असे. बोधी अस्तित्वात असेलच तर बोधीप्राप्तीची इच्छा किंवा मागणी हाच बोधीच्या मार्गातील एकमेव अडथळा आहे असे त्याचे मत होते.
जिद्दू कृष्णमूर्ती या समकालिनाशी त्याचा अनेकदा संबंध आला.