मोघम तर्क
Appearance
मोघम तर्क (फजी लॉजीक-Fuzzy Logic) म्हणजे 'अनेकमुल्य' असलेल्या ओव्हरलॅप[मराठी शब्द सुचवा] करणाऱ्या श्रेणी अथवा 'संदिग्ध गृहीत' असलेलेला तर्क होय; ज्यास तर्कशास्त्रात मात्रा अंश इत्यादीच्या संचाच्या प्रमाणात व्यक्त करण्याचा प्रयास केला जातो.
जसे चहा १०० से.ला उकळत आहे. हे सुस्पष्ट आहे(बायनरी सुधा). पण चहा वाफळला आहे असे म्हणणे व्यवहारात मोघम असते. वेटरला गरम चहा दे असे सांगतात. चहा ५० से. तापवुन दे असे सांगत नाही. मग अशी आज्ञा कॉम्प्युटरला कशी समजावायची ? त्याला तर चहा २५ ते ३९ से.ला तापव म्हणले तर ठरवताच येणार नाही. शिवाय गरम चहाची व्याख्या व्यक्ती परत्वेही वेगवेगळी (फजी) उरते. थोडक्यात प्रसंगानुरूप विविध फजी फॅक्टर सतत काम करत असतात. हे बायपास करता आले तर जे उरते ते शुद्ध वास्तव असते. [१]