Jump to content

मेमरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेमरी ही एक डेटा सूचना आणि माहिती सांभाळणारा विभाग असतो. मायक्रोप्रोसेसर्स प्रमाणेच मेमरी देखील सिस्टीम बोर्डला जोडलेल्या चकतीवर बसविलेली असते. मेमरीचे तीन प्रकार आहेत रॅंडम एक्सेस मेमरी, रिड ओन्ली मेमरी आणि फ्लॅश मेमरी.

रॅंडम एक्सेस मेमरी चकतीमध्ये  सूचना क्रम आणि सीपीयू सध्या प्रक्रिया करीत असलेला डेटा सामावलेला असतो. रॅमला अस्थिर किंवा तात्पुरती साठवण म्हणतात,कारण रॅमच्या बऱ्याच प्रकारांमध्ये मायक्रो कॉम्प्युटर बंद केला की लगेच रॅमवरचा डेटा जातो. जर वीज बंद पडली किंवा मायक्रोकॉम्प्युटरकडे जाणाऱ्या वीज प्रवाहात अडथळा आल्यास सर्व मजकूर जातो. यांच्याविरुद्ध दुय्यम साठवण ती आपले समाविष्ट भाग गमावत नाही. तो कायम स्थिर वा कायम साठा असतो. जसा काही हार्डडिस्कवर सांभाळलेलं डेटाच.

या कारणामुळे तर वर नमूद केलेल्या रॅमला तात्पुरती साठवण म्हणतात. कारण मायक्रो कॉम्प्युटर बंद होतो त्या क्षणीच रॅमवरची  सर्व माहिती पुसली जाते, म्हणूनच चालू कामांचा डेटा वारंवार दुय्यम साठवण  उपकरणांमध्ये साठवून ठेवण्याची कल्पना छान आहे. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या कागदपत्रांचे, एखाद्या स्प्रेडशीटचे काम करीत असाल, दर थोड्या मिनिटांनी तुम्ही तुमचे काम जतन किंवा स्टोअर करायला पाहिजे.

कॅच (उच्चार "कॅश" असा करतात.) मेमरी सीपीयू आणि मेमरीमध्ये तात्पुरत्या जलदगतीच्या समाविष्ट विभागासारखे काम करून प्रक्रियेत सुधारणा करते. रॅम मधली कोणती माहिती वारंवार वापरली जाते हे संगणक शोधून काढतो आणि मग त्याची "कॅश" मध्ये नोंद करतो.गरज असेल तेव्हा सीपीयु कॅश मधून ती माहिती झटकून घेतो. रॅम पुरेशी असणे महत्त्वाचे आहे. उदा मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००७ परिणामकारकतेने वापरण्यासाठी तुम्हाला किमान २५६ एमबी रॅम प्रोग्रॅम सामावायाला आणि अन्य ५१२ एमबी - १०२४ एमबी रॅम ऑपरेटिंग सिस्टीमला आवश्यक असते. काही ॲप्लिकेशन जसे फोटो एडिटिंग सॉफ्टवेर  अशांना तर जास्त रॅमची ही गरज भासू शकते. सुदैवाने गोष्ट म्हणजे एखाद्या संगणक प्रणालीत या अतिरिक्त रॅमची एखाद्या डीआय एमएम द्वारे (डय़ुअल इन मेमरी मॉडयुल) विस्तारित मॉड्यूल म्हणून सिस्टीम बोर्डमध्ये भर करता येते. रॅमची क्षमता बाईट्समधे व्यक्त केली जाते. मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी सर्वसाधारणतः मोजमापाची तीन एकके वापरली जातात.

अन्य प्रकारच्या रॅममध्ये डी रॅम, एडी रॅम, डीडीआर आणि थेट आरडी रॅम यांचा समावेश होतो.

जरी तुमच्या संगणकापाशी एखादा प्रोग्रॅम साठवायला पुरेशी रॅम नसली तरीही व्हर्चुअल मेमरी वापरून तो प्रोग्रॅम चालवणे त्याला जमू शकेल. आजकालच्या ऑप्रेटिंग सिस्टीमपैकी बऱ्याचश्या व्हर्चुअल मेमरीला सहाय्यक होतात. व्हर्चुअल मेमरीच्या मदतीने मोठया प्रोग्रामचे लहान विभाग करतात आणि ते नेहमी एखादया हार्ड डिस्कवरती दुय्यम मेमरीत साठवले जातात. मग प्रत्येक भाग रॅममध्ये गरजेनुसार वाचला जातो अशाप्रकारे संगणक प्रणाल्या मोठमोठे प्रोग्रम्स चालवू शकतात.

रीड ओन्ली मेमरी (रॉम) उत्पादकाकडूनच चिप्समध्ये माहिती साठवलेली असते. रॅमचिप्ससारख्या रॉमचिप्स तात्पुरत्या नसतात आणि वापरकर्त्याकडून बदलल्या जाऊ शकत नाहीत. ‘रीड ओन्ली’चा अर्थ असा कि रॉमचीपवर लिहिलेला डेटा आणि प्रोग्रम्स फक्त सीपीयूच वाचू शकतो, किंवा परत काढून घेऊ शकतो. काही झाल तरी संगणक रॉममध्ये माहिती किंवा सूचना लिहू, सांकेतिकरन करू वा बदलू शकत नाही.

रॉमचिप्सवर विशेषकरून संगणक प्रक्रियासाठीच्या तपशिलावर खास सूचना सामावलेल्या असतात.  उदा. एखादा संगणक चालू होताना रॉम सूचनांची गरज असते. मेमरी अक्सेससाठी आणि प्राथमिक कीबोर्ड इनपुट हाताळायला गरज असते.

फ्लॅश मेमरी

[संपादन]

फ्लॅश मेमरी ही रॅम आणि रॉमच्या गुणधर्मांचे एकत्रीकरण देते. नवीन माहिती साठवण्यासाठी रॅमप्रमाणे तिला अद्यायावात करता येते. संगणक प्रणालीची वीज बंद पडली टर रॉम प्रमाणेच ही पण (साठवलेली) माहिती गमवत नाही. फ्लॅश मेमरी ही अपलीकेशनच्या व्यापक प्रकारांसाठी वापरली जाते. उदा. ती संगणक चालू करतानाच्या सूचना साठविण्यासाठी वापरली जाते.

या माहितीमध्ये रॅमच्या राशीविषयी, किबोर्डचा प्रकार, माऊस, आणि सिस्टीमच्या त्या विभागाला जोडलेल्या दुय्यम स्टोरेज उपकरणाविषयी विशिष्ठ माहिती सामावलेली असते. जर कंप्युटर सिस्टीममध्ये बदल केले टर त्याचे प्रतिबिंब फ्लॅश मेमरीत दिसते.

संदर्भ- इलेक्ट्रॉनिक्स पुस्तक.