Jump to content

महात्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महात्मा ही एक उपाधी असून जिचा अर्थ "महान आत्मा" असा होय. ही संज्ञा महान व्यक्तीसाठी वापरली जाते, ज्यामध्ये मोहनदास करमचंद गांधी (१८६९-४८), स्वामी श्रद्धानंद (१८५६-१९२६), लालन शाह (१७७२-१८९०), अय्यांकली (१८६३-१९४१) आणि जोतीराव फुले (१८२७-१८९०) यांच्यासारख्या व्यक्तींचा समावेश होतो. हे ऐतिहासिकदृष्ट्या जैन विद्वानांच्या वर्गासाठी सुद्धा वापरले जाते.