Jump to content

पिंप्री तलाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ताम्हिणी घाट आणि ताम्हिणी गाव आहे. ताम्हिणी गाव ओलांडले की ३-४ किमी वर उजव्या हाताला लोणावळा फाटा लागतो. फाट्यावरून उजवीकडे वळले की एक लहानसा डांबरी रस्ता झाडीतून वळणे घेत घेत जातो. फाट्यापासून फक्त २ किलोमीटरवर पिंप्री नावाचे गाव आहे. गावाच्या थोडेसे अगोदरच रस्त्यात डाव्या हाताला एक सुंदर दरी आहे. जरा पुढे गेले की एक सुंदर लहानसा तलाव लागतो. तोच पिंप्री तलाव. पावसाळ्यात त्याच्या भिंतीवरून खाली दरीत पाणी कोसळत असते.