Jump to content

पंडुरोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Diseases of infancy and childhood (1914) (14771727962)

रक्तातील रक्तारुणाच्या (हीमोग्लोबिनाच्या) प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रमाणात घट होण्याला किंवा तांबड्या कोशिकांची (पेशींची) संख्या कमी होण्याला ‘पंडुरोग ’ किंवा ‘रक्तक्षय’ म्हणतात [⟶ रक्त; रक्तकोशिकाधिक्य]. तांबड्या कोशिका आणि रक्तारुण यांचा ऑक्सिजन वाहून नेण्याशी घनिष्ट संबंध असल्यामुळे पांडुरोगात ऑक्सिजन-न्यूनताउद्भवण्याचा नेहमी संभव असतो. पंडुरोगला इंग्रजी मध्ये अनेमिया असे म्हणतात.जगातील ३० टक्के लोकांमध्ये अनेमिया आढळून येतो. म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १५०० दशलक्ष लोक अनेमिक आहेत. हा रोग मानवी शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तेव्हा होतो.[] रक्तक्षय ही एक अवस्था आहे, जिचे वैशिष्ट्ये लाल रक्तपेशींची संख्या किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणें असे असते. आयरन डेफिशिअंसी( लौहाची कमतरता) अनिमिआ, मेगाबालास्टिक अनिमिआ, अप्लास्टिक ॲनिमिया आणि बरेच काही प्रकारचे रक्तक्षय असतात. अवस्थेची कारणे वेगळी असू शकतात,जसे परजीवी संक्रमण, अत्यधिक रजोस्राव, गर्भधारणे आणि कुपोषण यांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तक्षती. रक्तक्षयामुळे थकवा, कमजोरी, फिकट त्वचा आणि श्वास घेण्यात अडचण येऊ शकते. हेमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशींची संख्या, परजीवी संसर्ग वगळण्यासाठी शौच चाचणी आणि अप्लास्टिक ॲनिमियाच्या बाबतीत अस्थिमज्जा चाचणीद्वारे निदान केले जाते. रक्तक्षयावरील उपचार त्याच्या मूळ कारणांवर अवलंबून असतो आणि पोषणातील कमतरता असलेल्या अनीमियाच्या बाबतीत योग्य पोषण आणि लोहपूरक समाविष्ट करू शकतो. संपूर्ण रक्तप्रत्यांतरणाद्वारे गंभीर रक्तक्षयाचा उपचार केला जातो. हेच बरोबर आहे.

लक्षणे

[संपादन]
  • अशक्तता - जाणीव ही रक्तक्षयाचे सर्वात सामान्य लक्षण आहे आणि लक्षणीय हालचाल केल्याशिवायच थकल्यासारखे वाटते
  • श्वास घेण्यात अडचण - कधीकधी आपल्याला बरे असण्याच्या जाणिवेचा अभाव किंवा निष्कारण अस्वथता जाणवते,जी रक्तक्षयामुळे असू शकते.
  • चक्कर - येण्याला कधीही दुर्लक्षित करू जाऊ शकत नाही कारण यामुळे पडण्यासारखी दुखापत होऊ शकते. हे तुमच्या मेंदूला कमी प्रांणवायू पुरवठ्यामुळे होऊ शकते.
  • डोकेदुखी - डोकेदुखी हा सौम्य ते मध्यम प्रमाणात वेदना असणारा रक्तक्षयाचा एक दुर्मिळ लक्षण आहे

उपचार

[संपादन]

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाप्रमाणें लौह, जीवनसत्त्वबी 12 आणि फॉलीक ऍसिड पूरक तत्त्वे घेणें.

लौहप्रचुर आहार उदा. हिरव्या पालेभाज्या, ताजे फळे, अंडी, मांस,मासे इ. घेणें.

पुरेसे प्रमाणात जीवनसत्त्व-समृद्ध सायट्रस फळे खाणें उदा लिंबू, संत्री, आंबे इ. तसेच, जीवनसत्त्व सी पूरक औषधही सहज मिळतात.

एल्बेंडाझोल टॅब्लेट दर सहा महिन्यांनी एकदा मुलांच्या पोटातील किडे मारण्यासाठी द्याव्यात.

वर्गीकरण

[संपादन]

वर्गीकरण तांबड्या कोशिकांच्या आकारवैज्ञानिक वर्णनावरून करता येते. पांडुरोगाच्या निदानाकरिता प्रयोगशाळेतील रक्ततपासणी अत्यावश्यक असल्यामुळे या प्रकारचे वर्गीकरण इलाज करण्याच्या दृष्टीने हितकारक असते.

महाकोशिक पंडुरोग

दात्र-कोशिका पंडुरोग

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "Anemia In The Emergency Department: Evaluation And Treatment". www.ebmedicine.net. 2018-11-20 रोजी पाहिले.