क्यूपिड
Appearance
क्यूपिड (लॅटिन cupido, अर्थ :"इच्छा") हा एक रोमन पौराणिक देव असून इच्छा, स्नेह व कामुक प्रेम यांची देवता समजला जातो. ह्याचे वडील मार्स आणि आई व्हीनस. ग्रीक पौराणिक कथांमध्ये यालाच एरॉस म्हणतात. लॅटिन मध्ये यालाच अॅमोर (Amor) ("प्रेम") हे नाव आहे.
लोकसंस्कृतीमध्ये, क्यूपिड हा आपल्या धनुष्याने मदनबाण मारतांना दाखवला जातो. व्हॅलेंटाइन दिवसाच्या एका चिन्हाच्या रूपात तो आधुनिक संस्कृतीत प्रेम व प्रेमालाप यांचे प्रतीकरूप बनला आहे.