Jump to content

केरसुणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केरसुणी आणि सुपली

केरसुणी हे घर आणि परिसरातील कचरा साफ करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून केरसुणी बनते.[] महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची केरसुणीची पूजा करण्याचा रिवाज आहे. पुण्याला जवळच्याच जुन्नर शहरातून केरसुण्यांचा पुरवठा होतो. औरंगाबाद जवळच्या सोयगाव तालुक्यात शिंदीच्या पानांच्या केरसुण्या बनविणे हा पिढीजात व्यवसाय आहे. महाराष्ट्राच्या जंगलांतून शिंदीची झाडे संपत आल्याने आता ही पाने परराज्यांतून आणावी लागतात. केरसुणी हा कमी भांडवलातून चालणारा व्यवसाय आहे.

धार्मिक महत्त्व

[संपादन]
केरसुणी

दिवाळी उत्सवातील आश्विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. त्या दिवशी अलक्ष्मी घालवून लक्ष्मीचे स्वागत करताना केरसुणी पूजन करण्याची परंपरा महाराष्ट्र राज्यात प्रचलित आहे.[]



संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Diwali 2023 : तांत्रिक युगातही केरसुणीलाच 'लक्ष्मी' म्हणून पूजनाचा मान; कच्चा माल नसल्याने दरवाढ | in modern age Kersuni is worshipped as Lakshmi in diwali jalgaon news". eSakal - Marathi Newspaper. 2023-11-15 रोजी पाहिले.
  2. ^ वृत्तसेवा, प्रभात (2022-10-17). "केरसुणी बनवण्याची लगबग अंतिम टप्प्यात". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2023-11-15 रोजी पाहिले.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत