Jump to content

कर्विमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्विमान (ॲंग्स्ट्रॉम) (संक्षेप चिन्ह - Å) हे अतिसूक्ष्म लांबी मोजण्याचे एकक आहे. १ कर्विमान लांबी म्हणजे 10−१० मीटर. या एककाचा उपयोग विद्युतचुंबकीय तरंगांच्या लांबीचे मोजमाप दर्शवण्यास एकेकाळी प्रचलित होता, परंतु अलीकडील काळात ॲंगस्ट्रॉमच्या जागी नॅनोमीटर हे एकक अधिक प्रमाणात वापरले जाते.

या एककाचे नाव अँडर्स योनास ॲंग्स्ट्रॉम या स्वीडिश शास्त्रज्ञाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.