अफू
Appearance
अफू हा अफूच्या बोंडामधून काढलेला चीक वाळवून बनवलेला एक पदार्थ आहे. अफूचा वापर प्रामुख्याने हेरॉईन हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी व कमी अंशी खसखस हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच अफू वैद्यकीय उपचारांसाठी देखील वापरला जातो.
हेरॉईनची तस्करी हा जगातील एक प्रमुख गुन्हा आहे. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफूची शेती करणारा देश असून जगातील एकूण अफूच्या ७० टक्के उत्पादन येथेच होते.