Jump to content

मे.पुं. रेगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेघश्याम पुंडलिक रेगे या पानावरून पुनर्निर्देशित)

मे.पुं. रेगे तथा मेघश्याम पुंडलिक रेगे (२४ जानेवारी, इ.स. १९२४ - २८ डिसेंबर, इ.स. २०००) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पाश्चात्य तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. 'पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास', 'तत्त्वज्ञानातील समस्या' ही भाषांतरे, 'नवभारत (मासिक)' मधील त्यांचे लेख आणि विश्वकोशातील पाश्चात्य तत्त्वज्ञानविषयक व तत्त्ववेत्यांच्या नोंदी पहाता रेगे यांच्या कार्याची, त्यांच्या तत्त्वज्ञान मराठीत आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाची याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व इतर अनुषंगिक परंपरांचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती.

मार्च १९९६ मध्ये मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने मराठी भाषा – स्थिती आणि भवितव्य हया विषयावर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीतील बौद्धिक परंपरेविषयी व त्या अनुषंगाने मराठी भाषा व तिच्या भवितव्याविषयी मर्मभेदक भाष्य केले आहे. ज्ञानभाषा म्हणून मराठी स्थानापन्न होण्यात नेमका कोणता अडथळा होता याची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात आहे.

मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. ते 'नवभारत (मासिक)’ आणि 'न्यू क्वेस्ट’ या मासिकांचे संपादकही होते. त्याचप्रमाणे ते मराठी तत्त्वज्ञान महाकोश या प्रकल्पाच्या संपादक मंडळात होते.

शिक्षण - शिक्षणसंस्था

[संपादन]
  • प्राथमिक - रत्‍नागिरी येथे नगरपालिका शाळा
  • माध्यमिक - पार्ले टिळक विद्यालय, किंग जॉर्ज हायस्कूल मुंबई
  • महाविद्यालयीन - बी.ए. तत्त्वज्ञान एल्फिस्टन महाविद्यालय, एम. ए. मुंबई विद्यापीठ

कारकीर्द

[संपादन]
  1. १९४६-४९ : प्राध्यापक, नवसारी, गुजरात
  2. १९४९-५० : प्राध्यापक, अहमदाबाद, गुजरात
  3. १९५०-५४ : तत्त्वज्ञान विभागप्रमुख, मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद
  4. १९५४-७९ : तत्त्वज्ञान विभागप्रमुख, प्राचार्य, उपप्राचार्य, कीर्ती महाविद्यालय, मुंबई
  5. १९७९-८१ : संचालक, (पहिले), जी. डी. पारीख संशोधन केंद्र, मुंबई
  6. १९८१-८४ : संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे
  7. १९८४-२००० : अध्यक्ष, उपाध्यक्ष - धर्मकोश, वाई
  8. १९८४-२००० : अध्यक्ष, मराठी विश्वकोश मंडळ
  9. १९९६ : अध्यक्ष, मुंबई महानगर साहित्य संमेलन

संपादकपद

[संपादन]

१.१९८१-२००० :न्यू क्वेस्ट

२.१९८४-१९९८ :नवभारत (मासिक)

३.सदस्य : मराठी तत्त्वज्ञान महाकोश

४.अध्यक्ष : मराठी विश्वकोश मंडळ (४ जून १९९४ ते २८ डिसेंबर २०००)

पुरस्कार

[संपादन]
  • १९९५ : 'महाराष्ट्र फाउंडेशन'च्या पहिल्या वैचारिक साहित्य पुरस्काराचे मानकरी.
  • १९९६ : कोकण साहित्य-भूषण गौरवचिन्ह

पाश्चात्त्य पुस्तकांच्या आधारे लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • आकारिक तर्कशास्त्र - महाराष्ट्र ग्रंथनिर्मिती मंडळ, नागपूर, प्रथमावृत्ती १९७६

स्वतंत्र ग्रंथलेखन

[संपादन]
  • हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन - प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई, प्रथमावृत्ती नोव्हेंबर १९९४
  • इहवाद आणि सर्वधर्मसमभाव - प्रकाशक - प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई, प्रथमावृत्ती ऑगस्ट १९९६
  • मर्मभेद
  • विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व
  • विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा
  • स्वातंत्र्य आणि न्याय

भाषांतरीत पुस्तके

[संपादन]
  • तत्त्वज्ञानातील समस्या - मूळ लेखक: बर्ट्रांड रसेल. प्रकाशक: महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई. प्रथमावृत्ती मार्च १९७६
  • पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास - मूळ लेखक : मॅकेन्झी, प्रकाशक : समाजप्रबोधन संस्था, पुणे (प्रथम लेखमाला, नंतर पुस्तक स्वरूपात), प्रथमावृत्ती जून १९७४

मे.पुं. रेगे यांच्यावरील पुस्तके

[संपादन]
  • विचारक्षितिजे : लेखक दीपक घारे. ’या पुस्तकात प्रा. मे.पुं. रेगे यांच्या विचारांचा साक्षेपी मागोवा घेतला आहे.
  • प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान, लेखन व प्रकाशन : डॉ. सुनीती देव, ३/४ कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर ४४० ०१०, पहिली आवृत्ती २०००.

बाह्यदुवे

[संपादन]
विकिक्वोट
विकिक्वोट
मे.पुं. रेगे हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.