सदस्य:Sureshsdaoo
||जैमिनी सूत्रम||
प्रथम अध्याय - प्रथम पाद
उपदेश व्याख्यासामः ।।1।।
महर्षी जैमिनी म्हणतात कि लोक कल्याणकारी जातक शास्त्राविषयी माहिती सूत्रबद्ध केली आहे .
अभि पशन्त्यृक्षाणि ।। पार्श्वभेच ||2||
प्रत्येक राशी आपल्या सन्मुख असलेल्या राशी पहाते त्याच प्रमाणे आपल्या पार्श्वभागातील दोन राशी (दक्षिण व वाम भागातील) वर दृष्टी ठेवते अश्या प्रकारे प्रत्येक राशीची तीन तीन राशीवर दृष्टी असते चर राशी आपल्या राशीपासून व्दितीय स्थिर राशीला सोडून इतर तीन स्थिर राशींना पहाते. त्याच प्रमाणे स्थिर राशी आपल्या राशीपासून १२व्या स्थानातील चर राशी सोडून तीन चार राशींना पाहते.
तानिष्ठाश्च तव्दत् ।। 3 ।।
चरादी राशी स्थित ग्रह देखील राशी प्रमाणेच (सन्मुख आणि पार्श्वस्थित राशी आणि तद्गत ग्रहांना) पाहतात.
12 द्वि. 1 च. 11 स्थि. 2 स्थि. 10 च. 3 द्वि. 9 द्वि 4 च. 8 स्थि. 5 स्थि. 7 च. 6 द्वि. दृष्टीचक्र
वरील दृष्टीचक्र कुंडली मध्ये प्रत्येक राशीपासून तीन तीन राशीवर दृष्टी रेषा गेलेली आहेत. मेष राशीपासून सिंह,वृश्चिक व कुंभ राशींवर दृष्टिसुत्र गेले आहे म्हणून या तिनी राशीवर मेषेची दृष्टी आहे. यामध्ये वृषभ राशी सन्मुख व सिंह आणि कुंभ या राशी पार्श्वस्थित आहेत. या प्रमाणे प्रत्येक राशींच्या दृष्टीचा विचार केलेला आहे.
कटपयादि अ वर्ग
अ = ० इ = ० उ = ० ऋ = ० ॡ = ० ए = ० ऐ = ० ओ = ० औ = ०
क वर्ग
क = १ ख = २ ग = ३ घ = ४ ङ= ५ च = ६ छ = ७ ज = ८ झ = ९ञ= ०
ट वर्ग
ट = ० ठ = २ ड = ३ ढ = ४ण = ५ त = ६ ध = ७ द = ८ घ = ९ न = ०
प वर्ग
प = १ फ = २ ब = ३ भ = ४ म= ५
य वर्ग
य = १ र = २ ल = ३ व = ४ श = ५ ष = ६ स = ७ ह = ८
अंक ज्ञान चक्र
क-ट-प-य-वर्गवैरीहपिन्ड्न्त्यैरक्षरअङ्क| नि-ञि-चशून्य ज्ञेयंतथा स्वरे केवलम कधितम् || या ग्रंथामध्ये क वर्ग, ट वर्ग, प वर्ग, य वर्ग, यातील अक्षरांपासून भाव संख्या तथा राशी संख्या समजण्याकरिता अंकाचे ग्रहण केल्या जाते त्यातील न ञ आणि केवल स्वर (अ आ इत्यादी ) पासून शून्य अंक घेण्यात येतात. जिथे संयुक्त अक्षर असेल तिथे अंत्य अक्षराचा अंक घेण्यात येतो उदा. "स्व" या मधे अन्त्य अक्षर "व" असून य वर्गामध्ये चतुर्थ अक्षर असल्यामुळे स्व करीत ४ अंक घेण्यात येतो. अशाच प्रकारे "तत्र" या मध्ये ट वर्गातील त चीसंख्या ६ व त्र /र ची संख्या य वर्गामध्ये २ दिलेली आहे. परंतु याचा न्यास करण्या करीत अङकानां वामतो गतिः। या प्रमाणे न्यास केल्यास २६ अंकी आला त्यास १२ भाग दिल्यास २ शेष भाग राहतात म्हणजे या पासून व्दितीय भाग अथवा राशीचे आकलन होईल.
अर्गला योगमाह
दार भाग्य शूल- स्थार्गला निद्यातु :||4|| कटपयादि वर्गानुसार दार = 4 भाग्य = 2 शुल् 11 (दार =28/12 = 4 शेष, भाग्य =14/12=2शेष,शुल = 35/12=11 शेष) चतुर्थ, व्दितीय व अकराव्या स्थानातिल राशि व ग्रह अर्गला योग करतात .
कामस्था भूयासां पापना ||5|| काम = 3 (12/12 = 3 शेष) क्रुर व ग्रह तृतीय स्थानात असता अर्गला होते .
रिफ नीच कामस्था विरोधिनः ||6|| कटपयादि नुसार रिफ = 10 नीच = 12 कामस्था =3 (रिफ = 22/12 =10 शेष, निच = 60/12 =12,काम = 51/12 = 3शेष) ज्या प्रमाणे 4, 2, 11 स्थानातुन अर्गला होते तर 10, 12 व 3 स्थानातुन विरोध अर्गला होतात. तृतीय स्थान हे विरोधि अर्गला करते परंतु क्रुर ग्रह, राशि तृतियात असता अर्गला देखील करते. या स्थानोपन्न अर्गलेला विरोध स्थान/प्रतिबन्धक स्थान नाहि त्यामुळे य स्थानातुन होणाऱ्या अर्गलेस निराभास अर्गला म्हणतात यालाच शुद्ध अर्गला असे देखील म्हणतात याच्या विरुद्ध होणारी अर्गला हि साभास, विपरीत, पायार्गला असते. द्रष्टा पासून अर्गला स्थान बोध.
अर्गला स्थान 4 2 11 5 3 बाधक स्थान 10 12 3 9 *
मिश्रअर्गला शुद्धाअर्गला
अर्गला सोदाहरण 12मं 1 11 र.बु.रा. 2गु. 10
3 हो.ल 9शु.
4 घ.ल 8चं.
उपपद 5 7भाव/जन्म
लग्न 6
वरील दाखवलेल्या जन्म कुंडली चक्रामध्ये तुला राशी पासून व्दितियांत चंद्र आणि तुला राशीच्या व्दादश (कन्या राशीत) मध्ये कोणताही ग्रह नाही म्हणून चंद्र अर्गलाकारक होईल. तुला राशीपासून पंचमात रवी, बुध, राहू आहेत. तुला राशीचे बाधक स्थान नवम (मिथुन) राशी मध्ये कोणताही ग्रह नाही त्यामुळे हे तीनही ग्रह अर्गलाकारक होतील. तुला राशीपासून एकादशांत सिंहात केतू आहे परंतु तुला राशिच्या तृतीयात धनु राशीत शुक्र असल्यामुळे केतू अर्गलाकारक होणार नाही. याच प्रमाणे ग्रहा पासून अर्गलायोग पाहू. जन्म कुंडली चक्रांत रवी पासून व्दितीयांत म्हणजे मिन राशीत मंगळ असून रवीच्या या १२ व्या स्थानात कोणतेही ग्रह नाही त्यामुळे मंगळ अर्गला कारक होईल. रवी पासून चतुर्थात वृषभेत गुरु परंतु रवीच्या दशमांत प्रबळ चंद्र त्यामुळे चतुर्थ स्थानोप्पन्न अर्गला योग होणार नाही. रवीच्या एकादशांत धनु राशीत शुक्र आहे पण त्याच्या तृतीय स्थानात ग्रह नाही त्यामुळे शुक्र अर्गलाकारक होईल. या प्रमाणे अर्गलाचे आकलन करावे.
न न्यूना विबलाश्च ||7|| अर्गला स्थाना (४-१०-२) मधील ग्रहांपेक्षा बाधक स्थान (१०, १२, ३) मधील ग्रहाची संख्या अल्प असेल किंवा ग्रह निर्बल असेल तर अर्गला योगास बाधक होत नाही. तथापि या स्थानातील ग्रहाची संख्या जास्त असून ग्रह बलवान असल्यास ते बाधक होतात.
प्राग्वत त्रिकाणे ||8|| पंचम स्थानातील राशी व ग्रह हे अर्गला करतात व नवम स्थानातील राशी व ग्रह विरोधी अर्गला करतात (या व्दितीय स्थरावरील अर्गला/विरोधी अर्गला आहेत.)
विपरीत केतौ: ||9|| ग्रहासोबत केतू असता अथवा ज्या राशीत केतू आहे तेव्हा त्याची गणना विरुद्ध करावी (२-४ इतर स्थाने केतू पासून विरुद्ध दिशेने मोजावी.)
आत्माधिकाः कलभिर्नभोग:सप्तनष्टानां वा
॥10॥ ज्या ग्रहाचे स्पष्ट अंश जास्त आहेत तो आत्माकारक ग्रह धरावा. सात चारकारक -: या मध्ये रवी ते शनी अश्या ७ ग्रहाचा विचार केला आहे. अष्टचर कारक -: वरील ७ ग्रहाबरोबर राहूचा विचार करावा ज्या ग्रहाचे अंश जास्त तो आत्माकारक, दोन ग्रहांचे अंश सारखेच असता कला विकलांचा विचार करावा. महर्षी पाराशर व जैमिनी यांनी अष्टचरकारकाचा पुरस्कार केला असून तो उपयोगांत आणावा असे स्पष्ट विदित केले आहे.
स ईष्टे बन्धामोक्षयो : ||11|| आत्मा कारकापासून इष्टदेवता काढता येते. त्याचे disposition (आत्माकारक ग्रह ज्या राशीत आहे त्याचा स्वामि ज्या राशीत / स्थानात पडला ते स्थान किंवा राशी) हे पुनर्जन्म/मोक्ष दर्शवितो.
तस्यानुसरणादमात्य ||12|| आत्माकारक ग्रहांपेक्षा कमी अंश असलेला व्दितीय क्रमाने असलेला ग्रह अमात्यकारक ग्रह असतो. तस्य भ्रात्रा ||13|| तृतीय क्रमांकाचा ग्रह भ्रातृकरक तस्य माता ||14| चतुर्थ क्रमांकाचा ग्रह मातृकारक तस्य पिता ।।15।। पंचम क्रमांकाचा ग्रह पितृकारक तस्य पुत्रा: ।।16।।षष्ठ क्रमांकाचा ग्रह पुत्रकारक तस्य ज्ञाती: ।।17।।सप्तम क्रमांकाचा ग्रह ज्ञातिकारक तस्य दाराश्च ।।18।। अष्टम क्रमांकाचा ग्रह दाराकारक
महर्षी जैमिनी व पाराशर यांनी अष्टचरकारक पद्धातीचा अवलंब केलेला आहे. परंतु काही आचार्यानी सप्तचकारक पद्धतीचा विचार केला आहे. या मध्ये माताकारक व पुत्रकारक एकच असतो. या मध्ये "राहूचा" विचार केलेला नाही तथापि वेदांग ज्योतिष्यामधे महर्षी जैमिनी व पराशर यांनी असा विचार केलेला नाही म्हणून अष्टचर कारक पद्धती योग्य आहे. दोन अथवा अधिक ग्रह सारख्या अंशात असता ते दोन्ही ग्रह सहकारक ठरतात त्यामुळे चरकारक मधील पुढील जागा रिक्त होते. ती नैसर्गिक कारकाद्वारे बघतात. मातृकारक ग्रहांमध्ये दोन ग्रह सारख्याच अंशावर असता. दोन्ही ग्रह मातृकारक ठरतात व पुढील जागा पितृकारक हि रिकामी राहते. त्या वेळी नैसर्गिक कारक रवी चा विचार होतो. जर तीन ग्रहा सारखा अंशावर असल्यास ते तिन्ही मातृकारक होतात व पुढील पितृकारक व पुत्रकारक जागा रिकाम्या राहतात याचा विचार रवी व गुरु या नैसर्गिक कारकावरून करतात.
मात्रासह पुत्रम्येके सममनन्ति ।।19।।
काही आचार्य सप्तचर कारकांचा विचार करतात त्यामुळे पुत्रकारक व मातृकारक एकमेकांत मिसळलेले जातात हि पद्धत योग्य नाही हे सर्वसम्मत आहे. भागिन्यरत:श्याल:कनीयनजननि चेति ।।20।। मंगळ हा लहान बंधू, भगिनी, साळा, साळी व आईचा नैसर्गिक कारक आहे. मातुलदयो बन्धवो मातृ सजतिया इत्युत्तरतः ||21|| मामा, मावशी व सर्व मातृकुलाशी संबधित नातेवाईक यांचा कारक बुध आहे. पितमहौ पती पुत्रविती गुरुमुखादेव जानियात ।।22।। (वडिलांचे वडील) आजोबा, नवरा, पुत्र यांचा कारक गुरु आहे. पत्नी पित्रौ श्वसुरौ मातामहा इत्येन्तै वासिनः ||23|| पत्नी, सासू, सासरे, (आईचे वडील) आजोबा हे शुक्रवरून बघावे मन्दो ज्यायान ग्रहेषु ||24|| शनी पासून वडील भाऊ व इतर वडीलधाऱ्या नातेवाईकांचा विचार करावा.
प्राची वृत्तिविषमेषु ||25|| परा वृत्योत्तररेषु ||26|| राशी दशा काढतांना दशाराशीपासून त्याच्या स्वामीपर्यंत मोजावे. विषम राशी करीत राशी क्रमाने (zodically) मोजावे. तर सम राशीकरिता विरुद्ध क्रमाने मोजावे.( antizodically) राशीपासून त्यांच्या स्वामी पर्यंत मोजणी केल्यानंतर आलेल्या संख्येतून 1 वजा केल्यास तेवढी दशावर्ष त्या राशीची असतात.
न क्वचितः ।।27।। याला काही अपवाद दिलेले आहेत यात १) स्थिर राशी वृषभ, सिंह या पैकी वृषभ व वृश्चिक कुंभ या सम असून सुद्धा त्या राशिक्रमाने (zodically ) मोजतात कारण त्या समपद (odd footed) आहेत. तर सिंह, कुंभ या विषम पद असून देखील विरुद्ध क्रमाने (anti zodically) मोजतात, कारण त्या समपद (even footed) आहेत. 2) जर सिंह, कुंभ या विषम पद असून देखील त्या विरुद्ध क्रमाने मोजतात कारण त्या समपद आहेत. जर दशा स्वामी उच्च असेल तर 1वर्ष जोडावे, जर दशास्वामी निचीचा असेल तर १ वर्ष कमी करावे 3) राहू व शनी हे कुंभेचे स्वामी तर केतू व मंगळ हे वृश्चिकचे स्वामी जर दोन्ही स्वामी राशी मध्ये असता १२ वर्षे दशा जर एक स्वामी बाहेर असेल तर त्यापासून दशा मोजावी जर दोन्ही स्वामी बाहेर असतील तर बलवान स्वामी पासून एक दशा मोजावी जर दोन्ही स्वामी सारखे बलवान असता चा दशाकाळ मोठा असेल तो विचारांत घेतात.
नाथान्ताः समाः प्रायेनः ||28|| पुर्वचर्चित राशिदशा क्रम-विरुद्ध क्रमाने गणनेनुसार लग्नादी राशींना आपल्या स्वामी स्थित राशीपर्यंत जी संख्या येईल त्या त्या राशीचे तेवढे वर्ष चरदशा वर्ष होतात. प्राय: या मुळे असे सूचित होते कि भाव राशी पासून एक राशी पुढे त्याचा स्वामी असल्यास म्हणजे व्दितीयात असल्यास 1 वर्ष तृतियांत असेल तर 2 वर्षे व्दादशात असेल तर 11 वर्षे आणि राशी मध्येच स्वामि स्थित असल्यास 12 वर्षे.
यावव्दिवेक मावृतिभार्नाम ||29||
प्रत्येक राशीच्या दशेत 12 राशीची अंतर्दशा असते म्हणजेच 12 राशीची 144 अंतर्दशा भोग संख्या असते. अंतर्दशा एका राशीचा मान दशवर्षाच्या व्दादशांशइतका असतो. (अर्थात जितके वर्ष मान असते तितकेमास) यावदिशाश्रयं पदमृक्षाणाय ||30||
लग्नाचे आरूढ (पदलंग्न ) काढताना लग्नापासून लग्नेशापर्यंत गणना करावी तेवढीच स्थाने लग्नेशापुढे मोजावी म्हणजे ते लग्नाचे आरूढ असते. त्याच प्रमाणे इतर स्थानाचे आरूढ काढतात. स्वस्थे दारा: ||31|| (स्व - 4/12=4 दारा 28/12=4 शेष) जर राशीस्वामि चतुर्थात् असता आरुढपण चतुर्थात येते कारण आरुढ हे लग्न व सप्तम स्थानात येत नहि. तसेच रशिस्वामि सप्तमात असता आरुढ दशमात येते. सुतस्थे जन्म: ||32|| (सुत ६७/१२=७, जन्म ५८/१२=१० शेष) जर राशिस्वामी त्यापासून साप्तायांत असेल तर आरुढ हे त्या राशीपासून दशमांत येते. सर्वत्र सर्वांणा भावा राशयश्च ।।33।। महर्षी जैमिनी यांनी सूत्र तयार करतांना सर्व अध्यायांत भाव व राशिची संख्या (क -ट-प-य वर्गभर्वै : इत्यादी ) वर्ण अक्षरा पासून घेतली असून सवर्ण अर्थात वर्णद दशा सहित भाव व राशी घेतल्या आहेत तथापि वर्णा पासून ग्रंहांचा विचार केला नाही.
न ग्रहा: ।।34।।
ग्रहांना हे लागू नाही. होरा दया सिद्धा ।।35।। वर्ग कुंडल्या होरा, द्रेष्काण व इतर वर्ग शोडष कुंडल्यांचा अभ्यास शास्त्रानुसार करावा.
।। इति प्रथमाध्यायस्य प्रथमंपाद: ।।
संदर्भ :- 1 जैमिनी सुत्रम -श्री सितारामशर्म कृत "तत्वदर्श" हिन्दी-संस्कृत भाषा टिका. 2 जैमिनी सुत्रम -श्री लषणलाल झा हिन्दी-संस्कृत भाषा टिका. 3जैमिनी सुत्रम- श्री.विनय कुर्हेकर मराठी-संस्कृत भाषा टिका.
|जैमिनी सूत्रम||
Talk Last edited 19 hours ago by Flooded with them hundreds Wikipedia Contribution 2
||सर्वतो भद्रचक्रम||
अथात: सम्प्रवक्ष्यामि चक्रे त्रैलोक्यदिपकम् | विख्यातंमं सर्वतोभद्रं सद्द: प्रत्ययकारकम् ||1||
संस्कृत : भेदा ये स्वरपंन्चकेति | इति प्रथमांग समाप्तम| अथात: संप्रवक्ष्यामिति| अथातोऽत्रानन्तर्यार्षे | हंसचारानन्तर सर्वतोभद्रचंक्र प्रवक्ष्यमि | किंविशिष्टं त्रैलोक्यदिपकं दीप इव दीपकं त्रैलोक्य दीपयति प्रकाशयति घटपटदिवत् | त्रैलोक्य दीपकं विख्यातं लोकप्रसिद्धं तेन व्दिपदेशव्यापि | सद्ध: प्रत्ययकारकम | त्रिविधं सर्वतोभद्रं खन्डाखन्डोभयात्मकं चतुषष्टिपदं खन्डमेकाशितिम खन्डकम | शन्कुवर्गपद चक्रं खन्ड खन्डोभयात्मकम् | तन्मध्ये खन्डचक्रस्थ विधानं क्रियतेधुना |
मराठी : ब्रम्हयामलोक्त पंचस्वराध्यायामध्ये हंसाचार प्रकरणाचे वर्णन केल्यानंतर प्रस्तुत सुप्रसिद्ध सर्वतोभद्र चक्राचे वर्णन केलेले आहे. याला "त्रैलोक्यदिपक" असेही म्हणतात अर्थात हे चक्र त्रिलोकाला ( स्वर्ग, भूमि, पताळ ) दीपा सारखे प्रकाशमान करते. या चक्राचे सम्यकज्ञान प्राप्त झाल्यानंतर दैवंज्ञ भूत, वर्तमान व भविष्यत् कालासंबधीच्या विषयांचे कृतार्थाने वर्णन करु शकतो! ( ब्रम्हयामलतन्त्रोक्त सर्वतोभद्रचक्रक्रम | सम्यऽविज्ञाय दैवज्ञ
कृतार्थान् कुरुते जनान् ||)
या सर्वतोभद्र चक्राचे खण्ड , अखण्ड व उभयात्मक असे तीन प्रकार आहे. यांत खण्डचक्र 64 कोष्टाचे, अखण्डचक्र (सर्वतोभद्र चक्र) 81 कोष्टाचे आणि उभयात्मकचक्र 145 कोष्टांचे असते. याला "शंकुवर्गपद" चक्र हि देखील संज्ञा दिलेली आहे. "ब्रम्हयामल" ग्रंथा मध्ये अखण्ड चक्राच्या विधिचे निर्देश दिलेले आहेत.
ऊर्ध्वगा दश विन्यस्य तिर्यग्ररेखास्तथा दश | एकाशिति पदं चक्रं जायते नात्र संशय:||2|| अकारदिस्वरा: कोष्ठेष्विशा दिविदिशि क्रमात् | सृष्टिमार्गेण दातव्या षोडशैवं चतुभ्रमम ||3|| कृत्तिकादिनि धिष्ण्यानि पुर्वाशादि लिखेत् क्रमात् सप्त सप्त क्रमादेतान्यष्टविशतति संख्याय ||4||
मराठी : दहा रेषा उभ्या व दहा रेषा आडव्या काढल्यानंतर नि:संदेह 81 कोष्ठांचे चक्र निर्माण होते. सर्वप्रथम या चक्राच्या बाहेर, वर, खाली तथा कोनमध्ये क्रमशः दिशा व विदिशांची नांवे लिहावी तथा पूर्व आग्नेय, दक्षिण नैऋत्य , पश्चिम वायव्य, उत्तर ईशान्य | आता ईशान्य आदि चार कोणस्थ दिशांमधील 16 कोष्ठां मध्ये अ अ अकारादि 16 स्वरांना सरळ क्रमाने एक एक करून 4 वेळा लिहावे. या प्रकारच्या लिखाणामुळे अ, उ, लृ, ओ हे चार स्वार ईशान्य दिशेत. आ , ऊ, लृ, औ हे चार स्वर आग्नेय दिशेत इ, ऋ, ऎ, अ: हे चार स्वर वायव्य कोणांत लिहल्या जातील. चक्राशी फडताळणी करून खात्री करावी. कृतिका नक्षत्रा पासून अभिजित नक्षत्रासहित 28 नक्षत्र असून त्यामधिल कृत्तिकादि 7 नक्षत्र पूर्वेला, मघा आदि 7 नक्षत्र दक्षिणेला अनुराधा आदि 7 नक्षत्र पश्चिमेला आणि घनिष्ठा आदि 7 नक्षत्र उत्तरेला लिहावे. याचा सन्निवेश कोणामध्ये होत नाही.
अवकहडा दिशि प्राच्यां मटपरताश्च दक्षिणे | नयभजखाश्च वारुण्यां गसदचलास्तथोत्तरे ||5|| त्रयस्त्रयो वृशाद्दाश्च पुर्वाशादि बुधै: क्रमात | राशयो व्दादशैवं तु मेषान्ता: सृष्टिमार्गता ||6|| शेषेषु कोष्टकेष्ववं नन्दादितिथि पंचकम् | वाराणा सप्तकमं लेख्यं भौमादित्यक्रमेणच ||7|| भौमदित्यौ च नन्दायां भद्रायां बुधशीतगु | जयायां च गुरु प्रोक्तो रिक्ताया भार्गवस्तथा ||8|| पुर्णायां शनिवारश्च लेख्यं चक्रे निश्चितम | इत्येष सर्वतोभद्र-विस्तार: कीर्तितो मया ||9|| | पूर्व शास्त्रानुसारेण यथोक्तं ब्रम्हयामले |
मराठी : कटपय व्यंजनांचा समावेष या चक्रात या प्रकारे केला आहे अ, व, क, ह्,ड हि पाच अक्षरे पूर्वेला आणि म,ट , प, र, त हि पाच अक्षरे दक्षिणेला न, य, भ, ज, ख हि पाच अक्षरे पश्चिमेला आणि ग, स, द, च, ल हि पांच अक्षरे उत्तरेला लिहावी. शेष पाच कोष्ठकामध्ये नन्दादि तिथ्या या प्रकारे लिहाव्या. पुर्वेच्या कोष्ठांत नन्दातिथि , भद्रातिथि दक्षिण कोष्ठांत, जया पश्चिम कोष्ठांत , रिक्ता उत्तरकोष्ठांत आणि पूर्णातिथि मध्यकोष्ठांत लिहाव्या. याच नन्दादि तिथि असलेल्या कोष्ठा मध्ये मंगळ, रविवार यांना नन्दाच्या कोष्ठांत, चंद्र, बुधवार भद्रेच्या कोष्ठात, गुरुवार जयाच्या कोष्ठांत व शुक्रवार रिक्ताच्या कोष्ठांत आणि शनिवार पुर्णातिथिच्या कोष्ठांत लिहावे. अशा प्रकारे पुर्ववर्णित " ब्रम्हयामल" ग्रंथानुसार या सर्वतोभद्र चक्राचे निर्माण विधिचे वर्णन दिलेले आहे. या सर्वतोभद्रचक्रामध्ये 81 कोष्ठ असून त्यामध्ये 28 नक्षत्र, 16 स्वर,20 व्यंजन, 12 राशि, 5 नन्दादि तिथ्या बरोबरच सातदारांचा संन्निवेश केला असून य सगळयाचा योग 81 होतो
सर्वतोभद्र चक्र
ईशा. पुर्व दिशा आग्ने. अ.कृति.रो.मृग.आद्रा पुर्न.पुष्यआश्र्ल.आ भर.उ. अ.व. क. ह. ड.ऊ मधा अ. ल लृ वृष मिथुन कर्क लृ.म. पू.फा रेव.च मेष ओ.1/6 अौ.सिंह ट उ.फा
11र.मं
उभा.द मिन रिक्ता पूर्णा भद्रा कन्या.प.हस्त
4/9/ 5/102/7 14.शु 15श.12बुच
पुभा.स.कुंभ.अ:जया 3/8/
13 गु.अं.तुला र.चित्रा शता.ग.ऎ.मकर.धनु.वृश्चिक ए. त.स्वाति धनि.ऋ ख ज. भ य न. ऋ विशा ई.श्रव अभि.उ.षा.पूषा मूळ.जेष्ठा अनु.इ वाय. पश्चिम दिशा नैऋ.
"वेधज्ञान प्रकरण"
ऊर्ध्वदृष्टीच भौमार्की ककर्रो बुधभार्गवा | समदृष्टि जिवेन्दु शनिराहु अधोदृशै ||10|| निचस्थितौर्ध्वदृष्टिश्च उच्चेरधो निरीक्षयेत | समश्च पार्श्वतो दृष्टिस्त्रिधा दृष्टि: प्रकय्यते ||11|| शन्यर्क्रराहु केत्वारा: क्रुरा: शेषा: शुभग्रहाः | क्रुरयुक्तो बुधः क्रूरः क्षिणचन्द्रस्त्थैव च ||12|| यस्मिन्नृक्षे स्थितः खेटा स्ततो वेधत्रयं भवेतै | ग्रहद्रुष्टिवशेनात्र वामसम्मुख दक्षिणे ||13|| भुक्त भोग्यं तथा क्रान्तं विद्धं क्रुरग्रहेणच| शुभाशुभेशु कार्येषु वर्जनीयं प्रयत्नतः ||14|| वक्रणे दक्षिणा दृष्टिर्वाम दृष्टिश्च शीघ्रगे| मध्यचारे तथा मध्या ज्ञेया भौमादि पच्चके||15|| मंगळ व रवी यांना ऊर्ध्वदृष्टी, बुध , शुक्र यांना तिर्यकदृष्टि चंद्र व गुरु यांना समदृष्टि आणि शनी व राहू यांना अधोदृष्टि या प्रकारच्या दृष्टि असतात. ग्रह आपल्या नीच राशीत असतो तेव्हा ऊर्ध्वदृष्टी उच्चराशीत पार्श्वदृष्टी असते या प्रमाणे ग्रहांना दृष्टि असतात. शनी, राहू, केतू व मंगळ हे पापग्रह असून बाकीचे ग्रह शुभग्रह मानल्या जातात. पापग्रहाने युक्त बुध हा पापग्रहांप्रमाणे फळ देतो याच प्रमाणे क्षिण चंद्र हा देखील पापग्रह सदृश्य फळे देतो. ज्या नक्षत्रात ग्रह असतो त्या नक्षत्रापासून ग्रहदृष्टीमुळं वाम, सम्मुख व दक्षिण असे प्रकारचे वेध होतात. पापग्रहाचे भुक्त नक्षत्र, पापग्रहाचे भोग नक्षत्र व पापग्रह ज्या नक्षत्री असेल ते नक्षत्र आणि पापग्रह दुसऱ्या ग्रहाशी वेध करीत असेल तर हि चार नक्षत्रे शुभाशुभ कार्यासाठी वर्जित मानल्या गेली आहे. वक्री ग्रहाची दक्षिण दृष्टी, शीघ्रगती ग्रहाची वामदृष्टी आणि मध्यमगती ग्रहाची समदृष्टी असते, तथापि मध्यमगती (मंगल, बुध,गुरु,शुक्र,शनी) पाच ग्रहांपैकी जो ग्रह वक्री त्याची दृष्टी डाव्या बाजून शिघ्रगामि ग्रहाची दृष्टी उजव्या बाजूने व मध्यमगति ग्रहाची दृष्टी समोर (संमुख) असते. हे ग्रह वक्र, शीघ्र व मध्यगतीनुसार वेळोवेळी आपल्या क्रमानुसार चलीत होतात परंतु गती बदलामुळे त्याची दृष्टी देखील बदलते हा ज्योतिषशास्त्रीय सिद्धांत आहे.
सुर्यमुक्ता उदियन्ते सुर्यग्रस्तगामिनः | ग्रहव्दितीयागे सूर्ये स्फ़ुरद्बिम्बा कुजदयः ||6|| समा तृतियगे ज्ञेया मन्दा भानौ चतुर्थगे | वक्रा स्यातशष्तेर्के त्वतिवक्राष्टसातमे ||7|| नवमे दशमे भानौ जायते कुटिल गति: | द्वदर्षेकादशे सूर्ये भजते शिघृन्ता पुनः||8|| राहु केतु सदा वक्रै शीघ्रगौ चन्द्रभस्करो | गतेरेका स्वभात्वादेषा दृष्टि त्रयं सदा ||9|| क्रूरा वक्रा महाक्रुरा सौम्या वक्र महाशुभा:| स्थुः सहजस्वभावस्था: सौम्या क्रुराश्च शिघ्रगा:||20|| सूर्या पासून मुक्त ग्रह अर्थात सूर्याच्या मागील ग्रह आपल्या कालांशाने अधिक अंतरावर असतात ते उदीत होतात. सूर्याबरोबर कालांशाचा आंत जे ग्रह असतात ते अस्तंगत असतात. सूर्याच्या दुसऱ्या राशीमध्येअसणारा ग्रह शीघ्रगामी असतो हे भौमादि पंचतारा ग्रहांकरिता देखील लागू आहे. सूर्यापासून तृतीय राशीतील ग्रह समगतिक असतॊ चौथ्या राशीतील ग्रह मंदगतिक असते. पाचव्या सहाव्या राशीतीक ग्रह वक्रगतिक आणि सातव्या आठव्या राशीतील ग्रह अतिवक्र गतिक असतो. सूर्यापासून नवम, दशम स्थानातील ग्रह कुटीलगतीक असतो. अकराव्या व बाराव्या राशीतील ग्रह शीघ्रगतीक आणि सूर्याबरोबर असता. अस्तंगत असतो. राहू केतू सदा वक्रगतिक आणि सूर्य चंद्र सर्वदा शीघ्रगतीक असतात. राहू व केतू यांची गती एकसारखी व स्वभाव देखील एकसारखे असतात यांना 3 दृष्टी म्हणजे वाम, दक्षिण व सन्मुख अशा असतात. पापग्रह वक्री असतात अतिकुल असतात आणि शुभग्रह वक्री असता अत्यंत शुभ असतात. शीघ्रगतीक शुभग्रह शुभफळे देतात तथापि पापग्रह शीघ्रगतीक असता शुभफळे देतात.
अवर्नाव्दि स्वरौ द्वौ द्वावकवेधे व्दयोर्व्यधः | स्वरयुक्ता त्मनोर्वेधश्चानुस्वारविसर्गयो: ||2|| बर्वो शशौ षरवौ चैव ज्ञेयाङञाै परस्परम् | एकेन व्दितीय शेय शुभाशुभ् खगव्यधे ||22|| घङछा: षणठाश्चैव धफ़ढास्थ् झञास्तथा | एतत्रिकं त्रिकं विध्दं दिध्दै: कपदर्भेः क्रमात् ||23|| घङछा: रौद्रगे वेधे षणठा हस्तगे ग्रहे | घफ़ढा: पूर्वाषाधायां थझञा भाद्र उत्तरे ||24|| अवर्नादिस्वरव्देन्व्देष्वेकवेधे व्दयोव्यर्धः | युक्त स्वरत्मके वेधे त्वनुस्वारविसर्गयोः ||25||
अ-आ, इ-ई इत्यादि या दोन् स्वरापैकी एकाचा वेध झाल्यास दोन्हि स्वर विद्द होतात. याच प्रमाणे अ आणि अ: हे स्वरदेखील वेधित होतात. ब-व-श-स, ष,ख आणि ङ,ञ. हे सजातीय असतात यांच्या पैकी एक शुभग्रह अथवा अशुभग्रह वेधित झाल्यास दोन्ही वर्ण वेधित होतात. क प भ द या मधील एकाच वेध झाल्यास क्रमाने घ ङ छ , आदी तीन वर्ण वेधित होतात.आद्रानक्षत्रांत ग्रह असता घ ङ, छ, हस्त नक्षत्रात असता स ष ण ठ, पूर्वाषाढा नक्षत्रात असता ध फ ढ आणि उत्तराभाद्रपदा नक्षत्रात ग्रह असता थ झ ञ वर्ण वेधित होतात.
कोणस्थधिष्णयर्योर्मध्ये अन्त्यदिपादगे ग्रहे| अस्वरादिचतुष्कस्य वेध: पुर्णतिथे:क्रमात ||26|| एकादिक्रुरवेधेन फ़लं पुंसां प्रजायते | उव्देगश्च भयं हानि रोगो मृत्यु क्रमेणच ||27|| ऋक्षे भ्रमोक्षरे हानि: स्वरे व्यधिर्भयं तिर्थो | राशि विद्दे महाविघ्नं पञंविध्दो न जिवति ||28|| एकवेधे भयं युध्दे युग्मवेधे धनक्षय:| त्रिवेधेन भवेभ्देग्डगे मृत्युर्वेधश्चतुष्टये ||29|| यथादुष्टफ़ला: क्रुरास्तथा सौम्या शुभप्रदा: | क्रुरयुक्ता: पुन: सौम्या ज्ञेया: क्रुरफ़लप्रदा ||30|| अर्कवेधे मनस्तापो द्रव्यहानिश्च भूसुते | रोगपिडाकर: सौरि रहुकेतु च विघ्नदौ ||31|| चन्द्रे मिश्रफ़ळं पुंसां रतिलाभश्च भार्गवे| बुधवेधे भवत्प्रज्ञा जीव: सर्वफलप्रद: ||32||
सौम्य पापग्रहो हन्यान्नाम्नो व्याधि धनक्षय: | वेधे वैनाशिकक्षेस्य त्रिवेधे चायुषो भयम् ||33||
कोण स्थानांत असलेल्या नक्षत्रांच्या चतुर्थ आणि प्रथम चरणांत ग्रह असल्यास कोणत्या स्वरांचा आणि मध्यकोष्ठांत असलेल्या पूर्ण तिथींचा वेध होतो. उदा. ईशान्य कोणांत असलेल्या भरणी आणि कृत्तिका नक्षत्राच्या चतुर्थ व प्रथम चारणांत ग्रह असल्यास अ - उ- ऌ - ओ स्वरांचा आणि 5/10/15 या तीथींचा वेध होतो. या प्रमाणेच अन्य कोणस्थानाचा विचार करावा. प्रश्न कर्ता नांवाचा स्वर - वर्ण - नक्षत्र - राशी, तिथी या पैकी एक जरी क्रूर ग्रहाने (सू. मं. श. रा. के.) विद्ध असल्यास उव्देग, दोन ग्रहाने अथवा स्वरांमधील (वर्णादि) मधील दोन विद्ध असल्यास भय, तीन ग्रह अथवा तीन स्वरादि ने विद्ध असल्यास हानि, चार ग्रह अथवा चार स्वरादी ने विद्ध असल्यास तर रोगभय आणि पाच क्रूरग्रह अथवा पाच स्वरांनी विद्ध असल्यास मृत्यु होते. नक्षत्र क्रूरग्रहाने विद्ध असल्यास भ्रम, अक्षरविद्ध असल्यास हानी, स्वर, विद्ध असल्यास व्याधी, तिथी विद्ध असल्यास भय, राशी विद्ध असल्यास अतिविघ्न आणि हे पाचही विद्ध असल्यास मृत्यू येतो. जर एकच ग्रह वेध करेल तर युद्ध भय, दोन ग्रह वेध करतील तर धन हानी, तीन ग्रह वेध केल्यास तर युध्दांत पराजय आणि चार ग्रह वेध केल्यास मृत्यू प्राप्त होतो. ज्या प्रमाणे वेध केल्यानंतर पापग्रह शुभफळ देतो. त्याच प्रमाणे शुभग्रहांची वेध केल्यास शुभ फळ देतात. पापग्रह पापग्रहाने युक्त असल्यास तो अतिक्रूर होतो. पापग्रहोने युक्त बुध पापग्रहांप्रमाणे फळ देतो. पापग्रह हा शुभग्रहाने युक्त असल्यास मिश्र फळ देतो. शुभग्रह शुभग्रहाने युक्त असल्यास अत्यंत शुभ फळ देतो. जर रवी वेध करेल तर मनस्ताप, मंगळ करेल तर द्रव्यहानी, शनि करेल तर रोग व दुःख, राहू व केतू वेध करत असतील तर विघ्न येतात. चंद्र वेधाने मिश्रित फळ, शुक्र वेधाने स्त्रीसुख, बुधवेधाने बुद्धी वृद्धी, गुरुवेधाने सर्व प्रकारची शुभ फळे मिळतात. जर नामाक्षर नक्षत्रापासून वैनाशिक नक्षत्रास (२३ वे नक्षत्र)शुभ व पापग्रह वेध करीत असेल तर व्याधी व धनाचा नाश होतो. वैनाशिक, सामुदायिक व सांघातीक या तीन नक्षत्रांना शुभ व पापग्रहांनी वेध केल्यास मृत्यू प्राप्त होते.
***--------------
References
1 नरपतिजयचर्यासवरोदय: डॉ.सत्येन्द्र मिश्र संस्कृत हिन्दी टिका 2 सर्वतोभद्रचक्रम :डॉ.ब्रम्हानन्द त्रिपाठी संस्कृत हिन्दी टिका 3सर्वतोभद्रचक्र फलादेश: एस.के.अनिल, सागर पब्लिकेशन्स.
Content is available under CC BY-SA 3.0 unless otherwise noted. Terms of UsePrivacyDesktop8