सदस्य:Mpkachare

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार वाचकहो, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्याने व आपण समाजात राहत असल्याने आपण समाजाचे काही देण लागतो म्हणून मला येथे माझे मत परखडपणे मांडून समाजाचे पांग फेडायचे आहे.


सद्यस्थितीविषयी : दोन शब्द[संपादन]

     वाचक मित्रांनो, आज मला एक गोष्ट शल्य म्हणून बोचत आहे. भारतीय राज्याघटनेने ६ ते १४ वयोगटातील सर्व मुला-मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण प्रदान केले आहे. प्राथमिक शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा अधिकार व हक्क आहे. परंतु राज्याघटनेतील ही गोष्ट फक्त तेथेच अक्षर बनून राहिली. जर आपण आपल्या आजूबाजूला बघितले की आपल्या नजरेसमोर बरेच असे मुल-मुली आहे की त्यांचे पालक त्यांना वितभर पोटाची खडगी  भरण्यासाठी कामाच्या ठिकाणी सोबत घेऊन जाताना दिसतात. गळती व स्थगितीची यादी जर तयार केली तर सहज दोनशे-अडीचशे समस्यांची यादी समोर येईल.

     आधी शिक्षण घेऊ दिले जात नव्हते मात्र आता राज्याघटनेत शिक्षणाचा अधिकार असताना विविध कारण दाखवून मुलांना शाळेपासून दूर ठेवताय पालक लोक. गरिबी, दरिद्री, भूकबळी, स्थलांतर इ. समस्या सांगून मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा नाहक बळी घेतला जातो व त्यांच्या स्वप्नांचा खून दर दिवशी केला जातो.

       मला तरी असे वाटते की, पालकांनी स्वार्थी विचार न करता त्यांच्या पाल्याला शाळेत घालावे. शासन पैसा खर्च करायला तयार नाही असेही नाही. शासन प्रणालीवर भरवसा बसत नसेल तर अनेक खाजगी एन्जिओ आहेत की जे बालकांच्या शिक्षणासाठी झटतात.

     महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे." खरच शिक्षणाने माणसाच्या मेलेल्या मनाला संजीवनी मिळून त्याला अन्यायाविरुद्ध समर्थपणे लढण्याची ताकद येते. पण त्याने त्या ताकतीचा गैर वापर करायला नको.

    वाचकहो, आजची ही दळभद्री परिस्थिती बदलली जाऊन नवीन स्फूर्तीदायक जीवनाची ज्योत पेटवता येऊ शकते फक्त पाहिजे दुर्दम्य इच्छाशक्ती. आज जे मुल मुली फूठपाथ किंवा सिग्नलवर भिक मागून पोट भरताय, त्यांच्यासाठी आपण एक पाऊल आपण पुढे आलं पाहिजे. आपल्याला काही तुकाराम महाराजांसारखे धान्यांचे कोठार खुले करायचे नाहीय की बाबा आमटे यांच्या सारखं विषम परिस्थितीत काम करायचं. बस २ तास स्वताहून रस्त्यावरील किंवा गरीब झोपडपट्टीतील मुलं आहे त्यांच्यासाठी खर्ची घाला. बघा तुम्हाला स्वर्गीय आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही.

        मी सुरु केलंय, तुम्ही पण करा आणि व्हा खरे खुरे श्रीमंत.