सदस्य:Megha Chetule
आयवीएफ (IVF) एक वरदान
एका स्त्रीचं बाईपण पूर्ण होते तर तिच्या मुलाच्या जन्माने. आई होणे एका गोंडस बाळाला जन्म देणे हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतो पण जर एक स्त्री आई होऊ शकली नाही तर तो दुःख काय असतो हे तिलाच माहीत असते. पहिले तंत्रज्ञान विकसित नसल्यामुळे स्त्रियांना बाळ दत्तक घेणे होतं पण आता आयवीएफ हा गर्भ न धारण करू शकणाऱ्या स्त्रीसाठी वरदान आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेकांचं पालक बनण्याचं स्वप्न पुर्ण झालं आहे. हे तंत्रज्ञान काय आहे? हा कश्याप्रकारे काम करतो? काय खरचं एक स्त्री या प्रक्रियेने आई बनू शकते? असे अनेक प्रश्न हे ऐकताच निर्माण झाले असणार पण या लेखात आपण त्यांच उत्तर देणार आहोत.
आयवीएफ (IVF) म्हणजे काय?
आयवीएफचं पूर्ण नाव इन विट्रो फर्टिलायझेशन आहे. ही प्रक्रिया टेस्ट ट्यूब बेबी म्हणूनही ओळखल्या जाते. हे एक एडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे ज्यात स्त्रीची अंडी आणि पुरुषाचे स्पर्म लॅब मध्ये तंज्ञाच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित केले जातात आणि स्वस्थ गर्भ तयार करण्यात येतो. हा स्वस्थ गर्भ नंतर स्त्रीच्या गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो, ज्यानंतर गर्भधारणा आणि बाळाचा जन्म अगदी नैसर्गिकरित्या होतो. पण ही प्रक्रिया करण्याची वेळ का येते?
आयवीएफची गरज का?
आयवीएफच्या आधी नैसर्गिक गर्भधारण बद्दल समजून घेऊया. नैसर्गिक गर्भधारणेदरम्यान शुक्राणू आणि अंड्याचे मिलन स्त्रीच्या शरीरात होते. ज्यानंतर गर्भधारणा होते आणि ९ महिन्यांनंतर मूल जन्माला येते.परंतु शुक्राणू, गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब, किंवा अंड्यांमध्ये काही समस्या असतील ज्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा शक्य होत नसेल, तर आईवीएफ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मग आयवीएफची प्रक्रिया कशी केली जाते?
आयवीएफ प्रक्रिया:-
1. डॉक्टरांसोबत कंसल्टेशन:- आयवीएफ प्रक्रिया सुरू करण्याआधी सर्व प्रथम तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधावा लागतो. एक्सपर्ट फर्टिलिटी डॉक्टर तुमच्या स्थितीचं परीक्षण करून तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन देऊन तुम्हाला मानसिकरित्या तयार करतात व तुमची ट्रीटमेंट सुरू केल्या जाते.
2. ओवरियन स्टिमुलेशन:- या मध्ये इंजेक्शनने फॉलिकल्स विकसित केले जाते जेणेकरून जास्त स्त्रीबीज प्राप्त होतील. कारण जितकी जास्त चांगल्या गुणवत्तेची स्त्रीबीज मिळवता येतील तितके चांगले भ्रूण किंवा गर्भाशय तयार होईल.
3. सीमेन (वीर्य) सॅम्पल कलेक्शन:- आयवीएफ प्रक्रिया मध्ये प्रत्येक आयवीएफ सेंटर मध्ये सीमेन सॅम्पल कलेक्ट केलं जात. सॅम्पल घेतल्यानंतर एंड्रोलॉजिस्ट या सीमेन सॅम्पल मधून चांगले शुक्राणू वेगळे करून त्यांचं शुद्धीकरण केल्या जाते.
4. फर्टीलाझेशन:- योग्य तपासणी आणि चाचणी केल्यानंतर, अंडी आणि शुक्राणू गर्भधारनेसाठी प्रयोगशाळेत ठेवले जातात, ज्यांना नंतर एकत्रित करून त्याच भ्रूण मध्ये रुपांतर केले जाते.
5. गर्भ हस्तांतर:- ३-४ दिवसांच्या चाचणीनंतर स्त्रीच्या गर्भाशयात अगदी स्वस्थ भ्रूण ट्रान्सफर केले जाते तसेच ज्या प्रकरणांमध्ये गर्भाला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे त्या केस मध्ये १४ दिवसांनी गर्भ हस्तांतरण केले जातात या प्रक्रियेला मेडिकल भाषेत एम्ब्र्यो ट्रान्स्फर म्हंटल जाते.
6. गर्भधारणेची चाचणी:- आयवीएफ प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजे गर्भधारणेची चाचणी १४-१५ दिवसांनी, महिलेची गर्भधारणा चाचणी केली जाते त्यानंतर गर्भधारणा आणि बाळाचा जन्म अतिशय नैसर्गिक पद्धतीने होतो.
पण या आयवीएफ तंत्रज्ञानाचा काही यश दर आहे काय? ह्या प्रक्रियेचं फायदा कोणाला होतो? हे जाणणे आवश्यक.
आयवीएफचं यश दर व त्याचं फायदा कोणाला होतो:-
• आयवीएफचं यश दर:- सर्व आधुनिक उपचार आणि सक्षम डॉक्टरांसह, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये आयवीएफ उपचारांचा यशस्वी दर ७५-८०% आहे.यासोबतच अनुभवी डॉक्टरांची टीम उपचारानंतरही तुमच्या संपर्कात असते, तुमच्या प्रत्येक गरजेची आणि प्रश्नांची काळजी घेतली जाते. आणि जर तुम्हाला आयवीएफ प्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला एक्सपर्ट फर्टिलिटी डॉक्टरचं सल्ला घेणे आवश्यक आहे.
• आयवीएफचं फायदा कोणाला होतो:- एक स्त्री जी नैसर्गिकरित्या आई होऊ शकत नाही म्हणजे ज्या स्त्रीला ओवरिल्युशन ज्याला पी.सी.ओ.डी/ पी.सी.ओ. म्हणतात त्याची समस्या असेल. किंवा ब्लॉक फॅलोपियन ट्यूब्स असल्यास, फायब्रॉइड्स असल्यास, इनफर्टिलिटीची अस्पष्ट समस्या असल्यास किंवा अनुवांशिक समस्या असल्यास वा पुरुषांमध्ये पुरुष वंध्यत्व असल्यास याचं फायदा होतो.
आयवीएफचे फायदे:-
1. स्वस्थ गर्भधारणा आणि स्वस्थ शिशुचा जन्म:- आयवीएफचं फायदा म्हणजे या प्रक्रियेत, स्वस्थ स्त्रीबीज आणि शुक्राणूंची निवड केली जाते, ज्यामुळे स्वस्थ गर्भधारणेची शक्यता वाढते. या मध्ये असणाऱ्या अनुवांशिक रोगांना टाळता येते ज्यामुळे स्वस्थ बाळ होण्याची शक्यता असते.
2. शुक्राणू आणि अंडी दुसऱ्याकडून दत्तक घेऊ शकतो:- या प्रक्रियेत जर शुक्राणूंची गुणवत्ता खराब असल्यास किंवा अंड्यांची गुणवत्ता आणि संख्या कमी असल्यास तुम्ही डोनर कडून शुक्राणू आणि अंडी दत्तक घेऊन आयवीएफसाठी वापरू शकता.
3. तुम्ही गर्भधारणेसाठीची वेळ ठरवू शकता:- या प्रक्रियचं एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला वेळेचं स्वतंत्र मिळते. तुम्ही तुमच्या वेळेनुसार गर्भधारण करू शकता.
पण या प्रक्रियेचा काही नुकसान किंवा काही साईड इफेक्टस तर नाहीत न? आपल्याला या प्रश्नाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
आयवीएफचे साईड इफेक्टस:-
• आयवीएफ प्रक्रियेदरम्यान कॉम्प्लीकेशन्स
• ताण-तनाव
• हेवी वेजाइनल ब्लीडिंग
• अधिक बाळ ट्रिपल प्रेग्नेंसीचे चान्स असणे
पण या सर्वांची काळजी करू नका. आज तंत्रज्ञान इतकं विकसित झालं आहे की तुम्हाला काही होणार नाही याची काळजी तो घेतो. आणि तुम्ही जर ट्रीटमेंट सुरू केली तर डॉक्टर तुमच्यासोबत राहून तुम्हाला योग्य तो उपचार उपलब्ध करून देतात. त्यामुळे तुम्ही तुमचं पालकत्वाच आनंद बिंदास्तपणाने घेऊ शकता. तुम्हाला आम्ही या लेखात बरेचं प्रश्नाची उत्तरे देण्याचं प्रयत्न केला आहे आशा आहे हा लेख तुम्हाला आवडलं असेल आणि आणखी काही असल्यास तुम्ही तुमच्या जवळील एक्सपर्ट फर्टिलिटी डॉक्टरशी संपर्क साधावा धन्यवाद.