Jump to content

सदस्य:Manjita Mahadev Gauns Dessai

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शाबू बाबनी नाईक देसाई यांचा ८ जानेवारी १९३० रोजी कुंकळ्ळी गावातील मुरीडा येथे जन्म झाला व त्यांचा मृत्यू २ जानेवारी २००५ साली झाला. त्यांच्या आई-वडिलांकडूनच त्यांना देशभक्तीचे संस्कार आणि समाजसेवेचे बाळकडू पाजले गेले. यामुळे त्यांना देशसेवेमध्ये अधिक रस निर्माण झाला. त्यांनी अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. ग्रेट मराठा म्हणून संपूर्ण गोव्यात परिचित होते. शाबू देसाई यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व पणाला लावलेले. पोर्तुगीजांची अनेक मिशने त्यांनी सफल होऊ दिली नाही. एखादा कुणीही 'पाखला' दिसला तरीही त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडत होती. आपल्या गोमंत भूमीवर अत्याचार होताना त्यांना पहावत नव्हते. दादरा नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामासाठी ही त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी केलेली क्रांती ही संपूर्ण या कुंकळ्ळी गावाकरताच परिचित नाही तर संपूर्ण गोव्यात त्यांच्या क्रांतीचा परिचय आहे. DR. P. P. SHIRODKAR, WHO'S WHO OF FREEDOM FIGHTERS -GOA DAMAN AND DIU VOLUME ONE, GOVERNMENT PRINTING PRESS, PANAJI, GOA DECEMBER 1986 PAGE NUMBER 76