हिराभाई डाह्याभाई शहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिरालाल डाह्याभाई शहा (जन्म : पेढामली-मेहसाणा जिल्हा, ७ सप्टेंबर, इ.स. १९३३, मृत्यू : पुणे, २१ जुलै, इ.स. २०१६) हे पुण्यातील एक तांदूळ व्यापारी होते.

लहानपणीच वडील वारल्यानंतर हिराभाई आपल्या आईबरोबर पुण्याला आले आणि वयाच्या नवव्या वर्षापासून आपल्या काकांच्या व्यापारात त्यांना मदत करू लागले. गांधी विचारांच्या प्रभावात येऊन इंग्रजीवर बहिष्कार घालण्यासाठी त्यांनी शाळा सोडून दिली आणि मुंबईची वाट धरली. तेथे एका पेढीवर काही वर्षे नोकरी करून ते परत पुण्याला आले.

पुण्यात आल्यावर वयाची विशी गाठण्यापूर्वीच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतीच हिराभाईंनी तांदूळ विक्री व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. आधी आंबेमोहर आणि नंतर बासमतीसह सर्व जातींच्या तांदुळाच्या व्यापारात हिराभाईंनी केवळ पुण्यातच नाही तर देशभरात एक सचोटीचे आणि जाणकार व्यापारी म्हणून नाव कमवले.

तांदळाच्या खुल्या बाजारावर नियंत्रण आले असताना हिराभाईंनी पोहे आणि चुरमुरे-मुरमुर्‍यांचा व्यापार सुरू करून त्यामध्ये लौकिक संपादन केला. ‘प्रवासी पोहे’ नावाच्या एका पोह्यांची निर्मिती करून हिराभाईंनी त्याच्या चवीची पुणेकरांना चटक लावली. परदेशातही या पोह्यांची ते निर्यात करीत.

सामाजिक संस्थांशी संबंध[संपादन]

हिराभाईंचा समाजसेवेच्या निमित्ताने पुण्यातील अनेक संस्थांशी सक्रिय संबंध प्रस्थापित झाला. त्या संस्था अशा :-

 • आरसीएम गुजराथी हायस्कूल
 • एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय
 • कांताबेन महिला उद्योग
 • गुजराथी केळवणी मंडळ
 • गुजराथी हायस्कूल
 • जनसेवा फाउंडेशन
 • पुण्यभूष फाउंडेशन
 • पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन
 • द पूना मर्चन्ट्‌स चेंबर
 • पूना हॉस्पिटल
 • महावीर जैन विद्यालय