Jump to content

हठयोग प्रदीपिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हठयोग प्रदिपिका या पानावरून पुनर्निर्देशित)

हठयोग प्रदीपिका हा ग्रंथ स्वात्माराम ह्यांनी लिहिलेला आहे. हठयोग हा ग्रंथ अतिशय सुप्रसिद्ध ग्रंथ आहे. दुसरे योगी गोरखनाथ यांना गोरक्ष संहिता या ग्रंथाने ओळखले जाते. तिसरे मजकूर हे महान ऋषी घेरंडा यांची घेरंड संहिता आहे. याशिवाय हठरत्नावली नावाचा चौथा मोठा ग्रंथ आहे. जो नंतर श्रीनिवासभट्ट महाभोगेंद्र यांनी लिहीला आहे. हे सर्व ग्रंथ इसवी सनाच्या सहाव्या ते पंधराव्या शतकाधरम्यान लिहीलेले मानले जाते.

प्राचीन उपनिषद आणि पुराणांमध्ये हठयोगाचे किरकोळ संदर्भही आहेत.उपनिषद हे बौद्ध कालखंडाच्या पूर्वीचे आहेत,जे इसवी सनपूर्व सहाव्या शतकाच्या आसपास होते.उपनिषदांमध्ये दिलेल्या संदर्भांवरून असे दिसून येते की हठयोगाचे शास्त्र या काळापूर्वी चांगलेच ज्ञात होते. श्रीमद भागवत नावाचा आणखीएक महत्त्वाचा ग्रंथ आहे,कृष्णाची कथा. या विपुल ग्रंथात अनेक अध्यायांमध्ये हठयोगाचे संदर्भ आहेत.

हठयोगाचे पुरावे अमेरिकेच्या प्री-कोलंबियन संस्कृतीतही सापडले आहेत. आताही, दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाच्या दक्षिणेकडील प्रांत सेंट अगस्टिन येथे,हठयोग प्रथा दर्शविणाऱ्या मोठ्या दगडी आकृत्या आणि कोरीवकाम आहेत. तथापि,सहाव्या शतकात भारतात हठयोगाचे पद्धतशीर स्वरूप उद्यास येऊ लागले.

हे आपल्याला हठयोगाच्या एतिहासिक पैलूची झलक देते. शतकानुशतके या पुस्तकांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले आहे. भारतातही अनेक पंथ निर्मान होऊन गेले.नेपाळ आणि तिबेट हठयोगाच्या आधारावर अवलंबून आहेत. या पुस्तकांचा विषय काय आहे? हे केवळ तारुण्य शरीर राखण्यासाठी,की मानसिक शक्ति,शुध्यी प्राप्त करण्यासाठी,की संभाव्य उर्जा जागृत करण्यासाठी, कुंडलिनी आणि पराचैतन्य, समाधी प्राप्त करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आहे का? या ग्रंथाचे बारकाईने विश्र्लेषण केल्याने उद्येश अगदी स्पष्ट होतो.

प्राचिन काळी हठयोग चेतनेच्या उच्च अवस्थेची तयारी म्हणून अनेक वर्षे सराव केला जात असे.पन आज मात्र या महान शास्त्राचा खरा उदृयेश पूर्णपणे विसरला गेला आहे. प्राचिन काळातील ऋषी आणि ऋषीमुनींनी मानवजातीच्या उत्क्रांतीसाठी रचलेल्या हठयोग पद्धती आता अत्यंत मर्यादित अर्थाने समजल्या आणि वापरल्या जात आहेत.अनेकदा आपण लोकांचे म्हणणे ऐकतो “अरे,मी ध्यानाचा सराव करत नाही,मी फक्त शारीरिक योगासने करतो,हठयोग”. आता हा मुद्दा दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. हठयोग हे आज मानवतेसाठी एक अतिशय महत्त्वाचे शास्त्र आहे.

प्रथम उपदेश

[संपादन]

द्वितीय उपदेश

[संपादन]

तृतीय उपदेश

[संपादन]

चतुर्थ उपदेश

[संपादन]

संदर्भ

[संपादन]