Jump to content

सुश्मिता बॅनर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुष्मिता बॅनर्जी या पानावरून पुनर्निर्देशित)

सुष्मिता बॅनर्जी किंवा सयीदा कमला उपाख्य सुष्मिता बंदोपाध्याय (?? - सप्टेंबर ४, इ.स. २०१३) ही भारतात जन्मलेली व बंगाली आणि इंग्लिश भाषेत लिखाण करणारी लेखिका होती.[] तिने काबुलीवालार बंगाली बोऊ हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले. यात तिने आपल्या अफगाण युवकाशी झालेल्या लग्नाचे व अफगाणिस्तानमधील जीवनाचे वर्णन केले आहे. या पुस्तकावरून एस्केप फ्रॉम तालिबान हा चित्रपट निर्माण केला गेला.

सप्टेंबर ४, २०१३ रोजी अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतातील तिच्या राहत्या घरातून ओढून नेऊन तालिबानने तिची हत्या केली.[]

सुष्मिता बॅनर्जी यांनी लिहिलेली अन्य बंगाली पुस्तके

[संपादन]
  • एक बोर्नो मिथ्थ्या नोई (इ.स. २००१)
  • तालिबानी अत्याचार-देशे ओ विदेशे
  • मुल्ला उमर, तालिबान ओ आमी (इ.स. २०००)
  • सभ्यतर शेष पुण्यबाणी

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Indian author Sushmita Banerjee executed in Afghanistan by Taliban". 5 September 2013 रोजी पाहिले.
  2. ^ नारायण, चंद्रिका; Popalzai, Masoud. "Afghan militants target, kill female author, police say". 5 September 2013 रोजी पाहिले.