सुवर्ण विनिमय परिमाण
सुवर्ण विनिमय परिमाण (इंग्रजी: gold-exchange standard) हे एक आर्थिक प्रणालीतील एक मूल्य विनिमायचे आदर्श परिमाण किंवा मानक आहे. याद्वारे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर चलन आणि वस्तू विनिमय यांचे मूल्य ठरते. सुवर्ण परिमाणाची संकल्पना ही प्राचीन काळातील सोन्याच्या नाण्याच्या वापरावर आधारित आहे, ज्याला ‘सुवर्ण नाणे परिमाण’ असे म्हणतात.[१]
'सुवर्ण विनिमय परिमाण’ या मौद्रिक धोरणात शब्दशः सोन्याच्या नाण्यांचा वापर होत नसून त्या ऐवजी इतर धातूंच्या नाण्यांचा वापर केला जातो. संबंधित राज्य सरकार या नाण्याच्या बदल्यात सोने देण्याची कोणतीही हमी देत नाही, परंतु त्याऐवजी इतर दुसऱ्या एखाद्या देशाची मुद्रा (चलन) देण्याची हमी देत असते. याचा दुसरा फायदा म्हणजे हे धातूचे चलन सोन्यात परिवर्तनीय असते. याचे एक उदाहरण म्हणजे - ब्रिटिश काळात भारताच्या चलनाला म्हणजे भारतीय रुपयाला ब्रिटिश पौंडची, तर ब्रिटिश पौंडला अमेरिकेच्या अमेरिकन डॉलरची आणि तसेच अमेरिकन डॉलरला सोन्याची हमी होती. अशाप्रकारचा उलट सुलट व्यवहारातील द्राविडी प्राणायाम करून रुपयाला सोन्याची हमी दिली जात असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच सुवर्ण परिमाणांच्या प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांचा 'द प्रॉब्लम ऑफ द रूपी' (रुपयाची समस्या) नावाचा प्रबंध लिहिला. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला आहे.[२][३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "चलननिर्मितीमागील तत्त्वे". २९ मे २०२१ रोजी पाहिले.
- ^ >"अर्थशास्त्री आंबेडकर". २९ मे २०२१ रोजी पाहिले.
- ^ "अर्थतज्ज्ञ बाबासाहेबांचा विसर". Maharashtra Times. २९ मे २०२१ रोजी पाहिले.
- ^ "आंबेडकर को मात्र 'दलित-नेता' कहना उनके साथ सबसे बड़ा अन्याय" (हिंदी भाषेत). २९ मे २०२१ रोजी पाहिले.