Jump to content

सदस्य:माधव राजगुरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सदस्य:माधवकाका या पानावरून पुनर्निर्देशित)

माधव राजगुरू : मराठी भाषाभ्यासक. मराठी भाषा व शुद्धलेखन या विषयावरील पुस्तके प्रकाशित. बालभारतीमधून विशेषाधिकारी पदावरून निवृत्त. मराठी बालभारती पहिली ते आठवी पाठ्यपुस्तक निर्मितीत २० वर्षे योगदान. किशोर, जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, निरंतर शिक्षण, मुलांचा हिरो झंप्या इत्यादी मासिकांचे संपादन. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, अक्षरभारती अशा अनेक संस्थांवर कार्यरत. कथा, कविता, व्यक्तिचित्रणात्मक व विविध विषयांवरील संपादित व स्वतंत्र १७ पुस्तके प्रकाशित.

प्रकाशित ग्रंथ :

१. मराठी शुद्धलेखन : उत्कर्ष प्रकाशन, पुणे

२. मराठी भाषा - समज आणि ओळख : संस्कृती प्रकाशन, पुणे

३. गुरुजींचा गहिवर : (बाल व कुमार कथा) राचि प्रकाशन, सातारा

४. प्रतिभासंगम : लेखन तंत्र आणि मंत्र, प्रतिभासंगम प्रकाशन

५. मशाल : काव्यसंग्रह, मानसन्मान प्रकाशन, पुणे

६. जीवनशाळा : काव्यसंग्रह, अक्षरभारती, पुणे

७. बिकट वाट परि : आत्मकथन, अनुबंध प्रकाशन, पुणे

८. गुलजार पुणे आणि सुंदर बालभारती : उत्कर्ष प्रकाशन, पुणे

९. मुलांच्या भाषिक चुका, कारणे आणि उपाय : बालभारती प्रकाशन, पुणे

१०. माझा मराठीचा बोलू कौतुके : माधव राजगुरू गौरवार्थ ग्रंथ, सुविद्या प्रकाशन, सोलापूर

१०. मराठी गौरवगाथा : (संक्षिप्त आवृत्ती) मराठी भाषेचा गौरव करणार्‍या कविता, मॅजिक प्रकाशन, पुणे

११. मराठी गौरवगाथा : (विस्तृत आवृत्ती) मराठी भाषेचा गौरव करणार्‍या कविता, अक्षरभारती प्रकाशन, पुणे

१२. ज्ञानपीठ : ज्ञानपीठ पुरस्कृत लेखक परिचय, भामा प्रकाशन, पुणे

१३. ग्रामगीता : राष्ट्रसंत तुकडोजी विरचित (मूळ आवृत्तीप्रमाणे संशोधन) बालभारती प्रकाशन (१९९५)

१४. पर्यावरण बोध : (सहसंपादन), बालभारती प्रकाशन, पुणे (२००२)

१५. उत्तम संस्कार कथा : (संपादित) भाग १ ते ३, बालभारती प्रकाशन, पुणे