Jump to content

शेकाटया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शेकाटा या पानावरून पुनर्निर्देशित)
Black winged Stilt (Immature) I IMG 9021

मराठी नाव : शेकाटया, पाणटिलवा, टिलवा.
इंग्रजी नाव : Blackwinged Stilt (ब्लॅकविंग्ड स्टिल्ट)
शास्रीय नाव : Himantopus himantopus( हिमँटोपस हिमँटोपस )
आकार : २५ सेंमी

Himantopus himantopus P4278818

माहिती : उथळ पाण्यात वावरणारा हा एक काळा-पांढरा पक्षी असून त्याच्या लाल रंगाच्या आणि काड्यांसारख्या लांबलचक पायांवरून ओळखू येतो. नदीवर, तलावांच्या काठांवर शेकाटे दिसायला लागले, की पक्ष्यांचं स्थलांथर सुरू झाल्याची चाहूल लागते. पक्षीनिरीक्षक सावध होतात आणि इतर स्थलांतरी पक्ष्यांचा शोध सुरू होतो. दलदली, पाणथळ जागा, गावतळी, नद्या, मिठागरे आणि खाड्यांवर हे 'लंबूटांग' दिसतात.
निमुळत्या काळ्या चोचीच्या उपयोग करून शेकाटयांना गोगलगायी, कालव यांच्यासारखे कठीण कवचाचे जलचर, अळया आणि पाणकीटक पकडता येतात. हे पक्षी लहान-मोठ्या थव्यांमध्ये दिसतात आणि रात्रीच्या वेळी स्थलांतर करतात. रात्रीच्या अंधारात हे पक्षी एकमेकांना पाहू शकत नाहीत. त्यामुळे थव्यातला प्रत्येक पक्षी पिपाणीसारखा आवाज काढून आपापली जागा कुठे आहे हे दुसऱ्या पक्ष्याला सांगतो. काही शहरांमध्ये गटाराच मैलोपाणी नदीत ज्या ठिकाणी सोडलं जातं अशा जागा शेकाटे विशेष पसंत करतात. सुमारे ५० ते १०० पक्ष्यांचे थवे गोळा होतात. कारण अशा ठिकाणी त्यांना त्याचं खाद्य भरपूर प्रमाणात उपलब्ध होत. उथळ पाण्यात चालत जाणारा शेकाटया गरज वाटली तर पोहू शकतो.हा पक्षी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात माकुणसार, केळवे, माहीम, खारेकुरण येथील मिठागरात हल्ली दिसू लागला आहे.[]

चित्रदालन

[संपादन]
Black-winged Stilt (Himantopus himantopus)- Preening with Red-wattled Lapwings at Bharatpur I IMG 5605
  1. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक १ आगस्ट २०२३