"ईल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: अँग्विलिडी मत्स्यकुलातील अँग्विला वंशाचा मासा. या वंशाचे मासे ग...
(काही फरक नाही)

१२:४१, १२ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

अँग्विलिडी मत्स्यकुलातील अँग्विला वंशाचा मासा. या वंशाचे मासे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर अमेरिका, जपान, भारत इ. प्रदेशांत आढळतात. यूरोपीय जातीचे नाव अँग्विला

वर्णन

अँग्विला आणि भारतीय जातीचे अँग्विला बेंगालेन्सिस असे आहे. भारतीय ईलचे मराठी नाव अहीर आहे. याचे शरीर सापासारखे असून लांबी १.५ सेंमी. पर्यंत असते. श्रोणि-पक्ष (ढुंगणावर असणारे पर म्हणजे हालचालीस अथवा तोल सांभाळण्यास उपयुक्त त्वचेच्या स्‍नायुमय घड्या) नसतात. बहुतेक जातींत लांब पृष्ठ-पक्ष आणि गुद-पक्ष शेपटाच्या टोकावर एकमेकांना मिळून एक अखंड पक्ष तयार होतो. शरीरावर खवले नसून त्वचा बुळबुळीत असते. ईल मांसाहारी आहे. ईल माशाचे जीवनवृत्त असामान्य आहे.