Jump to content

विषामृत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विशामृत या पानावरून पुनर्निर्देशित)

विषामृत हा देशातील अनेक भागांमध्ये ३ ते १२ वर्षाच्या लहान मुलांचा आवडता खेळ आहे. हा एका मोठ्या गटात खेळला जाणारा एक लोकप्रिय खेळ आहे. शहरांमध्ये, पाश्चात्य प्रभावांमुळे, या खेळास लॉक आणि की म्हणून देखील ओळखले जाते.

या खेळात निवडलेल्या एका व्यक्तीवर राज्य असते. राज्य असलेला खेळाडू इतर खेळाडूंचा पाठलाग करतो आणि त्यांना स्पर्श करून आणि मोठ्याने "विष" म्हणून त्यांना विष देतो. एखाद्या खेळाडूला विष देण्यात येताच तो खेळाडू त्याठिकाणी गोठतो आणि त्याच्या इतर संघातील एखादा खेळाडू अमृत देऊन त्याला/तिला मुक्त होईपर्यंत आपल्या स्थितीत स्तब्ध राहतो. स्तब्ध खेळाडूला स्पर्श करून आणि "अमृत" ओरडून अमृत दिले जाते. जोपर्यंत सर्व खेळाडूंना विष देऊन होत नाही आणि अमृत द्यायला खेळाडू शिल्लक रहात नाही तोपर्यंत खेळ चालू राहतो.

हा खेळ एक मजेशीर खेळ आहे जो मिश्र वयोगटातील मुलांना एकमेकात मिसळण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी व्यासपीठ प्रदान करतो.