विनिमय दर
Appearance
अर्थव्यवस्थापनात दोन चलनांमधील विनिमय दर (इंग्रजी:Exchange Rate) हा एका चलनाचे दुसऱ्या चलनाच्या तूलनेत किती मूल्य आहे ते सांगतो. उदाहरणार्थ, डॉलरचा १२३ जपानी येन असा दर, म्हणजे १२३ येन हे १ डॉलरच्या समान आहेत असा अर्थ होतो. परकीय चलनाचा बाजार हा जगातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक आहे. एका अनुमानानुसार, ह्या बाजारात २००० अब्ज अमेरिकन डॉलर एवढ्या चलनाची देवाणघेवाण प्रतिदिवशी होते.
तत्काल विनिमय दर (Spot exchange rate) ही संज्ञा सध्याच्या विनिमय दरासाठी वापरतात. आगामी विनिमय दर (Forward exchange rate) ही संज्ञा जो विनिमय दर भविष्यातील ठराविक दिवशीचा वायदा म्हणून सांगितला जातो, त्यास वापरतात.