Jump to content

विकिपीडिया:नीती, ध्येय, धोरणे यांविषयीचे प्रश्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:नेहमी विचारले जाणारे प्रश्न या पानावरून पुनर्निर्देशित)

विकिपीडियावर मुळ लेखन किंवा स्वतःचे संशोधनही लिहू नये , इतरांचे प्रताधिकारीत लेखनही घेऊ नये आणि तेव्हाच इतरांच्या लेखनाचा संदर्भही द्यावा हे त्रांगड परस्पर विरोधी नाही काय ही समस्या कशी सोडवावी ?

[संपादन]

उत्तर: आपल्या आणि बहूसंख्य लोकशाही देशातील घटना स्वतःचे विचार आणि मते मांडण्याचे अभिव्यक्ति, विचार आणि मन व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देते. आपण मिळवलेली माहिती आणि ज्ञान एखाद्या किंवा अनेक स्रोतातून आलेल असत.तुम्हाला मिळालेली माहिती आणि ज्ञान (मुळ स्रोत कॉपी पेस्ट नकरता) तुम्ही स्वतःच्या शब्दात मांडता येत. तुम्ही स्वत: अर्जित केलेल्या ज्ञानावर स्वतःच्या शब्दात मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे.संदर्भ देताना आपण लिहिलेल्या स्वतःकडील माहितीस आपण दुसर्‍या व्यक्तिने दिलेला दुजोरा किंवा खंडन समिक्षणात मोडत.आणि समीक्षणावर कॉपीराईट लागू होत नाहीत.

मुळ लेखन किंवा स्वतःचे संशोधनही लिहू नये , इतरांचे प्रताधिकारीत लेखनही घेऊ नये. हे दोन निकष परस्परविरोधी वाटतात पण त्यांचा आशय एकमेकांना पूरक असाच आहे. येथे मूळ लेखन किंवा स्वतःचे संशोधन यात न पडताळण्याजोगे असे अभिप्रेत आहे. जर तुम्ही एखाद्या विषयात संशोधन केले असले आणि ते peer review झाले असले किंवा मान्यताप्राप्त प्रकाशनात प्रसिद्ध झाले असल्यास ते लिहिण्यास काहीच बंधन नाही, किंबहुना असे लेखक येथे आल्यास सोन्याहून पिवळे! वरील वाक्याचा आशय असा आहे की तुम्हाला जे वाटते किंवा तुमचा काही समज आहे किंवा तुम्ही घरबसल्या (किंवा ऑफिसबसल्या) चिंतन करून काही inferences काढले तर ते सत्य (facts) म्हणून विकिपीडियावर लिहू नये.

विकिपीडियावरील मुख्य नियम असा आहे की येथे सांगोवांगी माहिती लिहू नये. जी माहिती लिहिली जाते ती पडताळून पाहण्यासारखी असावी. त्याचवेळी इतरांच्या बौद्धिक संपत्तीचा मान राखावा. एखाद्या स्रोतातील माहिती त्याच शब्दांत जशीच्या तशी उतरवू नये, तर त्यातील सत्ये तुमच्या शब्दांत लिहावी पण मूळ स्रोताचा संदर्भ द्यावा, ज्याने तुम्ही लिहिलेल्या मजकूराची सत्यता पडताळून पाहता येईल. कोणतेही assertion केल्यास त्याला पुष्टी देणारा संदर्भ द्यावा

उदा - बेळगांव महाराष्ट्राचाच भाग आहे. -- हे assertion आहे. याला संदर्भ नाही. तरी हे लिहू नये. बेळगांव पूर्वी महाराष्ट्रात होते -- borderline truth. कारण बेळगांव जमखंडी संस्थानात (रामदुर्ग/धारवाड?) होते, जमखंडी संस्थान बॉम्बे प्रेसिडेन्सीत होते व बॉम्बे प्रेसिडेन्सीतील बराचसा भाग महागुजरात झाला. यातील विधानांना संदर्भ दिल्यास बेळगांव पूर्वी महाराष्ट्रात होते असे लिहिण्यास हरकत नाही. बेळगांव कर्नाटकात आहे. -- हे सत्य आहे. याला अनेक संदर्भ मिळतील. ते द्यावे. अबकड हे विष्णूचे अवतार होते. -- न पडताळण्याजोगे विधान. असे लिहू नये. पण, अबकड यांना विष्णूचा अवतार मानतात. -- जर कोण त्यांना विष्णूचा अवतार मानतात ते स्पष्ट करणारा संदर्भ दिला तर असे लिहिण्यास हरकत नाही. क्ष धर्मीय अतिरेकी आहेत. -- न पडताळण्याजोगे विधान. पण, क्ष धर्मातील अनेक व्यक्ती अतिरेकी झाले आहेत.' -- अर्धसत्य. विधान आहे तसे सत्य आहे, पण कोणत्या contextमध्ये वापरले गेले आहे यावरुन त्याचा आशय ठरतो. इतर धर्मांतही अनेक व्यक्ती अतिरेकी असतात. हे येथे नाकारलेले नाही आणी assertही केलेले नाही. सहसा अशा नरो वा कुंजरो वा विधानांवरुन वाद होतात. या विधानाला प्रकाशित अभ्यासाचा (published study) संदर्भ दिल्यास हे विधान पूर्णपणे acceptable आहे. समीक्षणावर कॉपीराईट लागू होत नाहीत. पण असे लिखाण समीक्षण असल्याचे स्पष्ट करावे. आपली व्यक्तिगत मते किंवा समीक्षण सत्य म्हणून लिहू नये किंवा तसा आभास निर्माण करू नये.

विकिपिडीयावर विशिष्ट व्यक्ती अथवा समुदायास अनुलक्षून आरोप करण्यात आले तर काय करावे?

[संपादन]

उत्तर: वरील लेखन '"विशिष्ट व्यक्ती अथवा समुदायास अनुलक्षून आरोप"' या गटात मोडते जाते आणि कोणत्याही क्षणी वगळले जाऊ शकते. विशिष्ट विचार अथवा कृती बद्दल आपली मतांतरे अगदी टीकाही ऐकून घेण्यास मराठी विकिपीडिया समुदाय नेहमीच उत्सुक असतो आणि असेल. अर्थात प्रत्येक व्यक्तीची, समूहाची कृती अथवा विचार आपल्याला पटणारे असतीलच असे नाही, "महात्मा गांधी" म्हणतात त्याप्रमाणे आपली टीका त्या विशिष्ट कृती अथवा विचाराबद्दल आपले अभ्यासपूर्ण मुद्देसूद मतांतर व्यक्त करण्यापर्यंतच मर्यादित ठेवावी, आपण करत असलेल्या टिकेचे चारित्र्यहननात, व्यक्ती अथवा समूहद्वेषात रुपांतरण होणार नाही याची दक्षता घेणे जरूरी आहे.

आपण काही महत्त्वपूर्ण मुद्दा मांडू इच्छित असाल तर तो मुद्दा बाजूस पडून विषयांतर होऊन आपल्या मुद्द्याच्या काही महत्त्वपूर्ण बाजूंचे नुकसान होऊ शकते हे लक्षात घेऊन व्यक्तिगत अथवा भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांची टीका कटाक्षाने टाळावी.

विकिपीडिया ज्ञानकोश सामूहिक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक स्वरूपांचे आरोप करू नयेत.

कायदा आणि गोपनीयतेच्या मर्यादांविषयीची वरील माहिती कोणत्याही सदस्यावर दबाव तंत्राचा भाग नसून विकिमीडिया फाऊंडेशनच्या आणि विकिपीडियाच्या परिघास असलेल्या मर्यादांबद्दल सजगतेचा प्रामाणिक प्रयत्न आहे. विविध भारतीय कायदे सोबतच आयटी कायद्यानुसार त्याला मर्यादा आहेत.देशातील कायदे अशा व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक पद्धतीच्या बोलण्यास, लिहिण्यास वा मांडणी वितरणास मान्यता अथवा संरक्षण देत असेलच असे नाही. विकिपीडिया कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनास उत्तेजन देत नाही; आणि म्हणून जर तुम्ही कोणतेहि अवैध लेखन या संकेतस्थलावर केले, या संकेतस्थळाचा (domain) दुवा दिलात, येथील उपलब्ध माहिती वापरली , पुनःप्रसारित किंवा पुनःप्रकाशित केली, आणि असे करताना नियमभंग झाला, तर अशा कोणत्याही रीतीने कायद्याच्या किंवा नियमाच्या उल्लंघनास विकिपीडिया किंवा विकिमिडिया जबाबदार नाही.इतर काही बंधू विकिप्रकल्पांप्रमाणेच मराठी विकिपीडियाची सदस्य माहिती विषयी गोपनीयता नीती परिघास सातत्याचा उपद्रव चारित्र्यहनन आणि कायदेविषयक संदर्भाने मर्यादा आहेत. अशी प्रावधाने खूप अपवादात्मक परिस्थितीत वापरली जातात पण वापरली जातच नाहीत असे नाही [गोपनीयता नीतीच्या परिघाच्या मर्यादांचा अभ्यास आपण येथे करू शकता]

एखादा विचार मुद्दा कृती पटत नसेल तर काय करावे ?

[संपादन]

उत्तर: विकिपीडिया हा ज्ञाकोश २००१ पासून तर मराठी विकिपीडिया २००३ पासून अस्तीत्वात आहे विकिमीडिया फाऊंडेशन, विवीध विकिप्रकल्प आणि मराठी विकिपीडिया सदस्यांच्या प्रदीर्घ चर्चातुन विवीध मुल्ये संकेत आणि नियमांची वेळोवेली आखणी होत आली आहे अगदी अनुभवी सदस्यांना सुद्धा सर्वच्या सर्व मुल्य आणि संकेताचे सर्व पैलू आणि कंगोरे माहितच असतील असे नाही . सर्व सहाय्य पानांचे वाचनही पूर्ण करणे आपल्या प्रमाणेच इतर सदस्यांनाही होतेच असे नाही.आपल्याला एखादि कृती विचार मुद्दा बद्दल आपले मतांतर असल्यास सर्व प्रथम संबधीत कृती विचार मुद्द्या बद्दल संबंधीत व्यक्ती तसेच इतर सदस्यांची भ्मिका अशी काहे आहे या संबधी माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करावा त्या नंतरही आपल्याला आपले मतांतर होत आहे असे वाटल्यास नेमक्या कोणत्या कृती अथवा विचारा बद्दल मतांतर आहे आणि का आहे हे व्यकिगत व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक स्वरूपांचे आरोप न करता मांडावे. अगदी प्रचालकांच्या कृती सहीत कोणतीही गोष्ट पटत नसेल तर त्याची अभ्यासपुर्ण आणि मुद्देसूद मांडणीकरून कृती किंवा लेखन पलटवण्याबद्दल सदस्यांची सहमती कौल पानांवर आजमावता येते.

विकिपीडियाच्या परिघाला मर्यादा आहेत.बिकिपीडियावरील निर्णय प्रक्रीया सहसा सहमतीने होते पण विकिपीडिया लोकशाही सुद्धा नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत असला तरी तो सर्व समावेशक ज्ञानकोश आहे अमुक्तस्रोताबद्दल अथवा आपणास न पटणार्‍या दृष्टीकोनांचीही येथे मांडणी असू शकते. आपल्या सर्व आकांक्षाना इच्छा आणि विनंत्या मराठी विकिपीडियन समुदाय कदाचित स्विकारू शकणार नाही असेही होऊ शकेल, तरी सुद्धा येथे जे काही काम होते यात बराच मोठा भाग हा सामान्य मराठी जनांना उपयोगी पडणारा सकारात्मक आहे.त्यामुळे उत्शाही रहा आग्रहही धरा पण त्याच वेली आग्रहाचे टोक गाठण्याचे अथवा आपल्या आग्रहा खातर इतर कुणाही व्यक्तीस अथवा समुहास व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपाचे भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक लक्ष्य करण्याचे टाळा .आपल्याकडे आधीच पुरेशा संपादकांची वानवा असताना आहे त्या संपादकांचे श्रम इतरत्र घालवून खच्ची करण्यात अवघ्या मराठी समाजाचे नुकसान होते हे आपण लक्षात घेऊन सहकार्य करावे. त्यामुळे काही गोष्टी रूचल्या नसल्या तरी सुद्धा सकारात्मकतेने आपण सहाकार्य करू शकाल.

वरील विषयी इतर सदस्य आणि प्रचालकांनी काय काळजी घ्यावी?

[संपादन]

उत्तर:

  • एखाद्या व्यकिगत टिका करणार्‍या सदस्याच्या व्यक्तिगत टिकेचा सामना झाल्यास त्यास व्यक्तिशहा घेण्याचे टाळावे.
  • विकिपीडियाच्या संकेतास धरून नसलेली टिका कुठेही आढलल्यास त्या बद्दल हा साचा संअब्दहीत सदस्याच्या चर्चा पानावर लावावा आणि नंतर व्यक्तिगत टिका वगळून टाकाव्यात.
  • मराठी भाषा व्यक्तिगत मत मतांतरापेक्षा खूप मोठी आहे हे लक्षात घेतल्यास आपणास आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्यास सहाय्य होईल.
  • लगेच उत्तर देण्याचे टाळावे , व्यक्तिगत टिकेस प्रत्यारोपाने अथवा व्यक्तिगत टिकेने कोणत्याही प्रकारे उत्तरच देऊन नये
  • व्यक्तिगत टिका करणे उत्पात अथवा संत्रस्त करण्याचे प्रयत्न झाल्यास सदस्याची नोंद विकिपीडिया:पहारा आणि गस्त#यांच्या योगदानावर लक्ष ठेवा विभागात करावी व अग्राह्य लेखनाचे नमुने विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात अभ्यास आणि तोडगे पानावर संचीत करावेत.त्यामुळे नाव बदलून वारंवार उपद्रव देनार्‍या सदस्य संपादनाबद्दल अधिक यशस्वी नियंत्रण करण्यात सहाय्य होते.
  • प्रचालकांनी सोशिओ पॉलिटीकली मजकुरातील विवादात प्रोअ‍ॅक्टीव्ह अ‍ॅक्शन घेण्याचे वाद विवादात सहभागी होण्याचे टाळावे. सहसा चर्चा आणि वाद विचवादांची जबाबदारी प्रचालकेतर सदस्यांनाच सांभाळू द्यावी आणि पुरेशी चर्चा आणि सहमती नंतर सुयोग्य निर्णयाची माहिती द्यावी.

मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?

[संपादन]

जगातील प्रत्येक समृद्ध भाषेला तिची एक लिपी असते. त्या लिपीतल्या मुळाक्षरांचे व त्यांच्यापासून बनणार्‍या शब्दांचे उच्चार योग्य रीतीने करण्यासाठी ती लिपी सक्षम असते. मात्र जेव्हा एखाद्या लिपीत परकीय भाषांतील शब्द लिहायची वेळ येते तेव्हा ते सुयोग्यरीत्या शक्य होतेच असे नाही. अशा लिहिलेल्या शब्दांचा उच्चार मूळ भाषेत होणार्‍या उच्चारांप्रमाणे होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळेच स्थानिक उच्चाराचा अनाठायी आग्रह धरण्यापेक्षा त्या परकीय नावाचे देशीकरण करून मगच तो शब्द भाषेत लिहिला जातो.

उदाहरणादाखल, उमर खय्यमचे इंग्रजी स्पेलिंग Omar Khayyam (ओमर खय्याम) असे करावे लागते. ते जर भारतीय पद्धतीने Umar Khayyam असे केले तर इंग्रजी उच्चार हमखास "यूमर खय्याम" होईल. याच कारणासाठी उमरखाडी, उस्मानाबाद, वगैरेंचे स्पेलिंग ’ओ’ने सुरू होते. अशा स्पेलिंगमुळे होणारे चुकीचे(?) उच्चार मूळ उच्चाराशी बर्‍यापैकी मिळतेजुळते असतात.

Londonचे हिंदी लिखाण लंदन आणि Englandचे इंग्लैंड असे केले जाते. कारण परकीय भाषांतील विशेषनामे आपल्या मातृभाषेत लिहिण्यासाठी त्यांच्यात बदल करून घ्यावाच लागतो. इंग्रजीमध्ये आपण जी फ़्रेंच वगैरे नावे वाचतो ती सर्व मूळ नावांचे इंग्रजीकरण केलेली असतात. तामीळमध्ये ख-ग-घ, छ-ज-झ-ठ-ड-ढ-फ-ब-भ ही अक्षरे नाहीत. त्यांनी जर परकीय विशेष नामे तथाकथित स्थानिक उच्चारानुसार लिहायचा प्रयत्न केला तर तो कदापीही यशस्वी होणार नाही. तेव्हा उच्चारांचे तामीळीकरण अपरिहार्य आहे.

बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते असे म्हणतात. म्हणून, ज्याला आपण स्थानिक उच्चार म्हणतो ते फक्त त्या स्थानाच्या बारा कोसाच्या त्रिज्येत राहणार्‍या लोकांचे उच्चार असू शकतात. ऑक्सफ़र्डच्या इंग्रजी कोशात दिलेले उच्चार हे दक्षिणी लंडनमधील शिक्षणसंस्थांच्या परिसरात ऐकू येणारे उच्चार आहेत, असे तो कोश सांगतो. याचा अर्थ असा की, त्या क्षेत्राबाहेरील लंडनमध्ये तसेच उच्चार असतील याची खात्री नाही. म्हणूनच ऑक्सफ़र्डच्या कोशात दिलेल्या निदान काही शब्दांचे उच्चार इंग्लंडमधल्याच कॉलिन्स किंवा केंब्रिजच्या कोशांत दिलेल्या उच्चारांहून भिन्न असतात.

चीनला त्यांच्या देशातल्या अधिकृत भाषेत त्षुङ्‌क्वॉ(Zhongguo) म्हणतात. आपण चीन म्हणतो, इंग्रजीत चायना म्हणतात. इतर भाषांत आणखीही नावे असतील. खुद्द चीनमध्येसुद्धा त्षुङ्‌क्वॉचे विविध स्थानिक(?) उच्चार नक्की असतील. त्यामुळे तसे पाहिले तर, स्थानिक उच्चार असे काही नसतेच. हो, प्रमाण उच्चार नावाची एक गोष्ट निश्चित असते. पण कोणत्याही भाषेतील शब्दांचे प्रमाण उच्चार करणारी विद्वान मंडळी एकूण लोकसंख्येच्या अर्धा टक्कासुद्धा नसतात. त्यामुळे त्या प्रमाण उच्चार या संकल्पनेशी सामान्य जनतेचे काही देणेघेणे नसते. विशेषनामाचे स्पेलिंग किंवा शुद्धलेखन मात्र नक्की प्रमाण असते. परंतु त्या स्पेलिंगचा उच्चार कसा करायचा ते आपापल्या परिसरात बोलीभाषा जशी बोलली जाते त्या बोलीभाषेतील संकेतांवर अवलंबून असते.

देवनागरीतील लिखाण बहुतांशी उच्चारानुसार असल्याने लिहिलेले जवळजवळ योग्य वाचले जाते. पण तेही शंभर टक्के नाही. हिंदीत लिहिलेला बैंक हा शब्द मराठीभाषक ब-इं-क असा वाचतो. मराठीत लिहिलेला कैफ हा शब्द हिंदीभाषक कॅइफ़ असा वाचतो. मराठीतला उपराष्ट्रपती, अगदी सुशिक्षित आणि विद्वान हिंदीभाषक उप्राष्ट्रपती असा वाचतात. याचा अर्थ स्पष्ट आहे. कुठल्याही लेखात किंवा त्याच्या मथळ्यात तथाकथित स्थानिक उच्चारातला शब्द असताच कामा नये. या बाबतीत त्या देशातल्या माणसाला विचारून काही उपयोग नसतो. कारण त्याच देशात त्याच विशेष नावाचे विविध उच्चार असू शकतात. महाराष्ट्रातला खेडूत आणि अगदी मुंबईतला रेल्वेचा हमाल मुंबईला म्हमई म्हणतो. हिंदीभाषक बंबई म्हणतो. खुद्द दिल्लीला दिल्लीत, दिल्ली, डेल्ली, देलही(पूर्व उत्तरप्रदेशी उच्चार) आणि देहली(हरियाणवी उच्चार) अशा चार नावांनी ओळखले जाते.

जर त्या परकीय शब्दाचे आधीच मराठीकरण झाले असेल(उदाहरणार्थ जपान, जर्मनी, टोकियो) तर प्रश्नच नाही, पण जर नसेल तर आपल्याला जगाकडे पहाण्यासाठी जी इंग्रजीची खिडकी आहे तिचा फायदा करून घ्यायचा. परकीय शब्दाचे इंग्रजीत जे स्पेलिंग होईल त्याचा मराठी माणसे करतील तसा उच्चार करून तोच उच्चार मराठीत लिहायचा. असे केले की मराठीभाषकांना ते विशेष नाव ओळखीचे आणि उच्चार करण्याच्या लायकीचे वाटेल.

इतरांची नावे आपल्या उच्चाराप्रमाणे बदलण्याची गेल्या शतकातली पद्धत तंत्रज्ञानाच्या प्रगतिमुळे यापुढे मागे पडत जाईल. कारण स्थानिक माणसे आपली नावे, आपली शहरे आणि भूप्रदेशांची नावे किंबहुना सर्वच विशेषनामे कशी उच्चारतात हे आज माध्यमांच्या तांत्रिक प्रगतिमुळे सहज कळते आणि परकी माणसेही त्याप्रमाणे उच्चार करू लागतात. अशा स्थितीत भविष्यकाळाचा विचार करता स्थानिक बोलीनुसारचेच किंवा तिच्या अधिकाधिक जवळ जाणारे उच्चारच, देवनागरीतून लिहिणेच श्रेयस्कर. इंग्रजाळलेल्या उच्चारांची सवय झालेल्याना कदाचित सुरूवातीला थोडे अवघड वाटेल, पण सवयही हळूहळू बदलू लागते. उगवत्या पिढीचा विचार करून स्थानिकांचेच उच्चार विशेषनामांबाबत वापरावेत. सध्यस्थितीत विकिपीडियावर विशिष्ट लेख शोधताना सध्या त्याची थोडी अडचण होईल. पण तोपर्यंत पुनर्निर्देशनाची पाने कायम ठेवून मार्ग काढता येईल. आणि सध्याचे शोधयंत्र आणखी प्रगत झाल्यावर ते इंग्रजाळलेल्या उच्चारानुसार शोध पाहूनही मूळ उच्चारानुसार पानाकडे नेईल. म्हणजे तुम्हीआम्ही टोकियो लिहिले तरी शोधपर्याय, पुनर्निर्देशनाशिवाय थेट तोक्योच्याच पानावर नेऊन पोहोचवेल.