Jump to content

सखाराम महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लोणी बुद्रुक सखाराम महाराज या पानावरून पुनर्निर्देशित)
श्री सखाराम महाराज समाधी हैदराबाद.

इसवी सनाच्या १८५९अगोदर होऊन गेलेले श्री सखाराम महाराज ऊर्फ सखारामबाबा हे डोमगाव परंपरेतील श्रेष्ठ कीर्तनकार आणि रामदासी कवी होते. समर्थवाग्देवता मंदिरातील बाड क्रमांक २०४मध्ये सखारामबाबाविरचित पंचीकरणाची वही आहे. त्या वहीत, सखाराम महाराजांनी पंचीकरण सुलभ करून सांगितले आहे. त्यांनी काही पदेही रचलेली आहेत. त्यांनी रामगीतेवर मराठी टीका लिहिली आहे.श्री सखाराम महाराजांचे चरित्र 'रामदासियांत मोठाची दिवा ' या नावाने श्री प्रमोद संत यांनी लिहिले आहे.

सखाराम महाराजंची समाधी खामगावला कविवर्य श्री.दि. इनामदार यांच्या जुन्या वाड्यात आहे.

सखाराम महाराजांची डोमगाव परंपरा अशी आहे :

  • रामदास स्वामी--> कल्याणस्वामी--> मुद्गल स्वामी--> भिवाजी--> महारुद्र--> हनुमंत--> सखाराम महाराज. (आधार : श्रीरामदासी संशोधन खंड पहिला, पृष्ठ १०७).

यांशिवाय, रामदासस्वामींच्या शिष्यपरंपरेत सखा नावाचे आणखी दोन कवी होऊन गेले, एक बाळनाथांचा शिष्य आणि दुसरा जनार्दनशिष्य. रामदासी नसलेले सखा नावाचे आणखीही कवी होऊन गेले, ते असे :

  • अभंगात्मक रामगीता लिहिणारे कवी सखाराम.
  • "आम्ही राजहौंस पक्षी । सहज आलो मुंबई शहरासी" लिहिणारा लावणीकार सखाराम.
  • वामनपंडितांच्या नावावर असलेल्या मराठी समश्लोकी गंगालहरीचा खरा कवी-सखा कवी.
  • वेदान्तपर लावण्या लिहिणारे सखा कविराय.
  • सखानंद नावाचा पदे लिहिणारा एक कवी.
  • सखाराम जगजीवन नावाचा गंगालहरीची समश्लोकी लिहिणारा तिसरा कवी.
  • सखारामतनय(सखारामसुत) नावाचा कवी. याने आर्याबद्ध रुक्मिणी स्वयंवर लिहिले आहे.
  • सखाराम त्र्यंबक ऊर्फ नाना गर्दे नावाचे चरित्रकार. यांनी चिदंबरस्वामींचे पद्यमय चरित्र आणि इतरही काही काव्ये लिहिली आहेत.