विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा/नियम-मराठी
Appearance
(लेख संपादन स्पर्धा/नियम-मराठी या पानावरून पुनर्निर्देशित)
हे पान विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धेच्या नियमांची माहिती देते.
आयोजक
[संपादन]- ही स्पर्धा मराठी विकिपीडियाचे प्रबंधक व सदस्य मिळून आयोजित करतील.
- इतर सदस्यांना स्वयंसेवक होण्यासाठीची घोषणा लवकरच केली जाईल. जर जास्त संख्येने उमेदवार आले तर प्रबंधक स्वयंसेवकांचे नामनिर्देशन करतील.
स्पर्धक
[संपादन]- ही स्पर्धा मराठी विकिपीडियाच्या सर्व सदस्यांसाठी खुली आहे.
- या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेत भाग घेऊ शकतात, पण ते कुठल्याही प्रकारच्या क्रमवारी अथवा बक्षिसासाठी पात्र असणार नाहीत. जरी अशा सदस्यांनी दुसर्या नावाने सदस्यत्व घेऊन या स्पर्धेत भाग घेतला आणि जर ते सिद्ध झाले तर अशा सदस्यांचे आयोजक पद रद्द केले जाईल तसेच त्यांचा स्पर्धेतील सहभागही रद्द केला जाईल.
- स्पर्धकांनी स्पर्धेच्या नामनिर्देशन सत्रात स्पर्धेसाठी नामनिर्देशन करणे बंधनकारक आहे.
- स्पर्धक स्वतंत्र्यरीत्या वा गटातून सहभागी होऊ शकतात. जर गट स्थापन करुन स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल तर एका गटात पाच (५) पेक्षा जास्त सदस्य नसावेत. तसेच गटातील एक सदस्य ’मुख्य सदस्य’ म्हणून निवडला जावा जो आयोजकांशी सर्व प्रकारच्या चर्चेसाठी उपलब्ध राहील.
रूपरेषा
[संपादन]- आयोजक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या लेखांची यादी प्रसिद्ध करतील. असे लेख कदाचित पूर्वी अस्तित्वात असतील अथवा प्राथमिक अवस्थेत असतील.
- प्रत्येक स्पर्धकाने (एकट्याने अथवा गटात) नामनिर्देशन सत्रात दोन लेख संपादनाकरिता निवडावे. लेखांची निवड ही पूर्णत: प्रथम आलेल्यास प्राधान्य या प्रमाणे होईल. स्पर्धेचे विजेते दोन्हीपैकी जास्त गुण मिळविणार्या लेखांप्रमाणे निवडले जातील.
- स्पर्धकाने निवडलेले लेख स्पर्धेसाठी उपलब्ध असलेल्या लेखांच्या यादीतून वगळले जातील. तसेच आयोजक ही यादी नंतर वाढवू सुद्धा शकतील (जर गरज वाटली तर).
- स्पर्धक स्वत: सुद्धा संपादन करण्याकरिता लेख सुचवू शकतात. आयोजक त्यावर विचार करुन स्पर्धेच्या नियमात बसणारे लेख स्पर्धेसाठी उपलब्ध करुन देऊ शकतात.
- स्पर्धक लेख संपादन त्यांना लेख दिल्यानंतर लगेच सुरू करु शकतील. असे लेख सदस्य नसलेल्या व्यक्ती संपादित करु नयेत म्हणून सुरक्षीत केले जातील. अशा लेखांच्या सुरवातीला इतर संपादकांनी संपादन करू नये अशी सूचना दिली जाईल. तरीसुद्धा लेखात इतरांकडून होणारे बदल ही सर्वथा स्पर्धकांची जबाबदारी राहील.
- स्पर्धा सुरू होण्याचा दिनांक निश्चित केला जाईल व त्यानंतर नामनिर्देशन होऊ शकणार नाही.
- स्पर्धा सुरू होण्याच्या दिनांकापासून दोन आठवड्यांनी सर्व लेख सुरक्षीत केले जातील व त्यात संपादन होऊ शकणार नाही व परीक्षक या लेखांचे खाली नमूद केलेल्या निकषांच्या आधारे परीक्षण करतील.
- स्पर्धेतील विजेत्यांची क्रमवारी स्पर्धा समाप्त झाल्यानंतर तीन दिवसांचे आत प्रसिद्ध केली जाईल.
स्पर्धेचे निकष
[संपादन]प्रत्येक लेख हा विविध निकषांवर पारखला जाईल. प्रत्येक निकषाकरिता काही गुण ठरविण्यात आलेले आहेत. ज्या लेखांचे सर्वात जास्त गुण होतील असे लेख विजेते म्हणून घोषित केले जातील.
निकष पुढीलप्रमाणे --
- लेखाची लांबी -
- स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी लेखाची लांबी किमान १६ केबी (किलोबाईटस्) असली पाहिजे.
- त्यापुढील प्रत्येक केबी साठी एक गुण दिला जाईल.
- मांडणी* - लेखाची मांडणी विविध विभाग व उपविभाग (जशी गरज असेल त्याप्रमाणे) अशी करावी. लेखाच्या मांडणीकरिता जास्तीत जास्त पाच गुण दिले जातील.
- चित्र* - लेखात ठिकठिकाणी योग्य अशी चित्रे असावित. चित्रांसाठी जास्तीत जास्त पाच गुण दिले जातील.
- दुवे -
- अंतर्गत दुवे - प्रत्येक दुव्यासाठी (मराठी विकिपीडियातील) ०.१ गुण दिले जातील.
- लाल दुवे - प्रत्येक लाल दुव्यासाठी ०.२ गुण वजा केले जातील. स्पर्धक असे लाल दुवे रद्द करण्यासाठी अस्तित्वात नसलेले लेख लिहू शकतील.
- आंतरविकि दुवे - प्रत्येक दुव्यासाठी (कुठल्याही विकिपीडियातील) ०.१ गुण दिले जातील.
- संदर्भ दुवे - प्रत्येक बाह्यदुव्यासाठी ०.५ गुण दिले जातील.
- इतर संदर्भ - इतर संदर्भदुवे जे आंतरजालावर उपलब्ध नाहीत (उदा. पुस्तक अथवा वर्तमानपत्र). अशा प्रत्येक संदर्भ दुव्यासाठी ०.३ गुण दिले जातील.
- वर्ग - प्रत्येक योग्य वर्गवारीला ०.२ गुण दिले जातील. वर्गांची योग्यायोग्यता परीक्षक निश्चित करतील.
- पुनर्निर्देशने - प्रत्येक पुनर्निर्देशनाला ०.१ गुण दिले जातील.
- येथे काय जोडले आहे - मराठी विकिपीडिया वरचा प्रत्येक लेख जो या लेखाकडे निर्देश करतो अशा दुव्यांसाठी ०.१ गुण दिला जाईल.
- - ज्या निकषांवर (*) अशी खूण आहे अशा निकषांचे गुण परीक्षक निश्चित करतील.
परीक्षक
[संपादन]आयोजकांमधील काहीजण परीक्षक म्हणून काम बघतील.
बक्षिसे
[संपादन]- प्रत्येक विजेत्यास खास विकि-पदक देण्यात येईल. त्याशिवाय प्रत्येक प्रतिस्पर्ध्यासही वेगळे विकि-पदक असेल.
- विजेते लेख पुढील काही महिन्यांचे मुखपृष्ठ सदर होतील.
- विजेत्यांना ऑफ-लाईन प्रसिद्धी देखील मिळण्याची शक्यता आहे.
विकिपीडिया हा पूर्णतः स्वयंसेवकांच्या हिमतीवर चाललेला असल्यामुळे (सध्यातरी) रोख किंवा इतर बक्षिसे देण्याचे शक्य नाही.