लुइस गॉर्डन प्यूग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुइस गॉर्डन प्यूग
लुइस गॉर्डन प्यूग
जन्म ५ डिसेंबर, १९६९ (1969-12-05)
प्लायमाउथ, इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज, युनिव्हर्सिटी ऑफ केप टाऊन
पेशा ब्रिटिश पर्यावरणविषयक कार्यकर्ता, सामुद्रिकी विषयातील वकील [श १] आणि लांब पल्ल्याचा जलतरणपटू[श २]
वडील सर्जन रिअर ॲडमिरल पी. डी. गॉर्डन प्यूग
आई मार्जरी प्यूग
संकेतस्थळ
lewispugh.com

लुइस गॉर्डन प्यूग (इंग्लिश: Lewis Gordon Pugh) (५ डिसेंबर, इ.स. १९६९ - हयात) हा ब्रिटिश पर्यावरणविषयक कार्यकर्ता, सामुद्रिकी विषयातील वकील [श १] आणि लांब पल्ल्याचा जलतरणपटू[श २] आहे.

तो सर्व महासागरांमध्ये लांब पल्ल्याचे जलतरण (यामध्ये वेगापेक्षा अंतर अधिक महत्त्वाचे असते.) करणारा पहिला जलरणपटू आहे. [१] पर्यावरणाच्या दृष्टीने नाजूक असणाऱ्या ठिकाणी पोहून त्या प्रदेशातील पर्यावरणविषयक समस्यांकडे लक्ष्य वेधण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आर्क्टिक प्रदेशातील वितळणाऱ्या बर्फाच्या प्रश्नाकडे जगाचे लक्ष्य वेधण्यासाठी तो इ.स. २००७ मध्ये उत्तर ध्रूवावर १ कि.मी. अंतर पोहून गेला. तसेच इ.स. २०१० मध्ये हिमालयातील वितळणाऱ्या हिमनद्या (glaciers) व त्यातून भविष्यात होणाऱ्या पिण्याचा पाण्याचा तुटवड्यामुळे जागतिक शांततेवर होणारा परिणाम याकडे प्रसारमाध्यमांचे तसेच देशांचे लक्ष्य वेधण्यासाठी तो हिमालयातील हिमनदी वितळून बनलेल्या तळ्यातून पोहून गेला.

इ.स. २०१० मध्ये जागतिक आर्थिक मंचाने यंग ग्लोबल लिडर म्हणून त्याचा गौरव केला. [२]

पारिभाषिक शब्दसूची[संपादन]

  1. १.० १.१ सामुद्रिकी विषयातील वकील (इंग्लिश: maritime lawyer, मेरिटाइम लॉयर)
  2. २.० २.१ लांब पल्ल्याचा जलतरणपटू (इंग्लिश: endurance swimmer, एंड्यूरन्स स्विमर)


संदर्भ[संपादन]

  1. जो स्प्रिंग. "जगातील सर्वोत्तम थंड पाण्यातील जलतरणपटू", आउटसाइड ऑनलाईन, डिसेंबर, इ.स. २००९. जून ०३, इ.स. २०१२ रोजी तपासले. (इंग्रजी मजकूर) जून ०३, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 
  2. "यंग ग्लोबल लिडर्स २०१०", जागतिक आर्थिक मंच, मार्च इ.स. २०१०. मार्च ३, इ.स. २०१० रोजी तपासले. (इंग्रजी मजकूर) मार्च ३, इ.स. २०१० रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]