लाटणे (बेलणं) हे उपकरण भारतीय स्वयंपाकघरात पोळी बनवण्यास वापरले जाते. लाटणे बहुदा लाकूड वा धातूचे असते. भारतीय लाटणे आकाराने दंडगोल, लांबीला सुमारे एक फूट व व्यासाने ३ - ४ सेमी असते. यास दोन्ही बाजूस मुठी असतात. पाश्चात्य लाटणे ढकलदंड (रोलर) स्वरूपात असून सामान्यतः एका मुठीचे असते.