Jump to content

रक्तवाहन यंत्रणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुधिराभिसरण या पानावरून पुनर्निर्देशित)

रक्तवहसंस्थेमध्ये हृदय, रक्त, रक्तवाहिन्या यांचा समावेश होतो. रोहिणी रक्तवाहिन्या शुद्ध रक्तवहन करते(अपवाद- फुफ्फुसीय रोहिणी- ही हृदयाकडून फुप्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेते.) त्या लाल रंगाने दर्शविल्या जातात. नीला रक्तवाहिन्या अशुद्ध रक्तवहन करते(अपवाद-Pulmonary vein- ही फुफ्फुसाकडुन हृदयाकडे शुद्ध रक्त वाहून नेते.) त्या निळ्या रंगाने दर्शविल्या जातात. हृदय फासळ्यांंच्या पिंजऱ्यात असते. आपल्या मुठीच्या आकाराचे आपले हृदय असते. ते चार भागांमध्ये विभागलेले असते आणि रक्त एकाच दिशेने ह्या चार भागांमधून फिरते. उजव्या कर्णीकेतून उजव्या जवनिकेत, तिथून फुफ्फुसामधे, तिथून डाव्या कर्णीकेत, तिथून डाव्या जवनिकेत, तिथून रोहिणीं द्वारे पूर्ण शरीराला, तिथून निलांद्वारे पुन्हा उजव्या कर्णीकेत असा रक्ताचा प्रवास होतो.

रोहिणी शरीरात खोलवर असतात तर नीला बाहेरील बाजूने असतात. रोहिणींमधील रक्त अधिक दाबाने वाहत असल्याने त्यांच्या भिंती जाड आणि लवचिक असतात. निलांच्या भिंती तुलनेने पातळ असतात, निलांमध्ये रक्त परत जाऊ नये म्हणून झडपा असतात. त्या कमी लवचिक असतात.

मानवी रक्तवहसंस्था