Jump to content

रंगभूषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रंगभूषाकार या पानावरून पुनर्निर्देशित)

साचा:'''रंगभूषा''' रंगभूषेला नाटय,नृत्य, चित्रपट अशा सर्वच कलाप्रकारात महत्त्व आहे.रंगभूषा महत्त्वाची का असते, तर रंगमंचावर जेव्हा एखादा नट, नटी, नर्तक अथवा नर्तकी पाऊल ठेवते, तेव्हा आकर्षक पोशाखाबरोबरच त्याचा अथवा तिचा चेहरा सर्वप्रथम नजरेस पडतो. रंगमंचावर जेव्हा प्रकाश असतो तेव्हा तो चेहरा इतका स्पष्ट आणि छान का बरे दिसतो? याचे एकमेव कारण म्हणजे रंगभूषा. रंगमंचावर नाटक किंवा नृत्यप्रस्तुती करताना आपल्या चेहऱ्यावरील ओठ, गाल, भुवया, आणि डोळे हे छोटे अवयव म्हणजेच ज्यांना उपांग असे म्हणले जाते, अतिशय महत्त्वाची भूमिका पर पाडत असतात. आता महत्त्वाची भूमिका म्हणजे नक्की काय? तर आपण अनेकदा एखादी नाटय अथवा नृत्यप्रस्तुती पाहिल्यावर म्हणतो की ‘काय सुंदर हावभाव होते चेहऱ्यावरचे!’ तेव्हा या उपांगांवर जे रंग लावलेले असतात. त्यामुळे ते अधिक ठळक आणि स्पष्ट दिसतात. त्यामुळेच कलावंतांचे न हावभाव रसिकांपर्यंत पोहोचतात. आणि रसिक नाटय व नृत्यप्रस्तुतीचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकतात.

रंगभूषा करण्यासाठी वेगवेगळ्या ब्रॅंडच्या ‘पॅनस्टिक’, ‘पॅनकेक’, ‘३१ंल्ल२४’ंल्ल३ पावडर’ अथवा ‘ूेस्र्ूं३ पावडर’, ‘वेगवेगळ्या रंगांच्या आय लायनर’, मस्कारा आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ‘लिपस्टिक’ ही महत्त्वाची साधने मुख्यत्वे वापरली जातात. रंगभूषा करताना सुरुवातीला ‘बेस’ करून घेतात. ‘बेस’ करतात म्हणजे चेहऱ्याचा जो रंग असेल त्याप्रमाणे पॅनस्टिक आणि पॅनकेकचा योग्य प्रमाणात वापर करून चेहऱ्यावर जर डाग असतील तर ते प्रथम काढून टाकले जातात. बेस करून झाल्यावर डोळे, नाक, गाल, ओठ यावर काम करतात. हावभाव हे डोळ्यांतूनच बाहेर येत असतात. हेच डोळ्यातील हावभाव प्रेक्षागृहात शेवटच्या ओळीत बसलेल्या प्रेक्षकालाही दिसावेत म्हणूनच डोळे अधिक गडद करतात. नाटय व नृत्याची संकल्पना आणि वेशभूषा यावरून आयशाडोचा रंग ठरतो. अनेक वेळा गुलाबी रंगाची आयशाडोच डोळ्यांसाठी वापरली जाते. लिपस्टिक ही बरेचदा मरून रंगाची वापरतात. लिपस्टिक लावण्याआधी ओठांचा आकार आकर्षक दिसण्यासाठी आउट लाइन करणे महत्त्वाचे आहे.


सुप्रसिद्ध रंगभूषाकार बाबा वर्दम, कृष्णा बोरकर, प्रभाकर भावे,पंढरीदादा जूकर,राम टिपणीस, शशिकांत साटम, शंकर वर्दम, उल्हास शिरसाट, विलास कुडाळकर, नंदू वर्दम,राजन वर्दम यांच्या सारख्या रंगभूषाकारांनी नाट्य व चित्रपट सृष्टी नटवली आहे. एक नाट्याशय किंवा नृत्याची संकल्पना काय आहे, वेशभूषा कशी आहे तसेच केशरचना कशी आहे यावरून त्या त्या नाट्याची, नृत्याची रंगभूषा ठरते. नाटय व नृत्यासाठी वॉटरप्रूफ मेकअप अधिक उपयोगी असतो कारण नृत्य करताना खूप घाम येतो. वॉटरप्रूफ मेकअप केल्यामुळे घाम आला तरी चेहऱ्यावरील मेकअप खराब होत नाही. त्याचप्रमाणे नृत्यामध्ये डोळ्याच्या रंगभूषेला अधिक महत्त्व आहे असं त्या आवर्जून सांगतात.

कथकली नृत्यशैलीचा मेकअप हे रंगभूषेचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण. या नृत्य प्रकारात इतर सर्व नृत्य आणि अभिनय प्रकारपेक्षा जास्त रंगाचा वापर केला जातो. आणि हा आविष्कार करण्याचीसुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. ही रंगभूषा करण्याची एक विशिष्ट आणि खूप लांबलचक अशी पद्धत आहे. आणि मुख्य म्हणजे ही रंगभूषा कलाकाराला झोपवून केली जाते.

रंगभूषेचे चित्रपटातील एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण सगळ्यांनी ‘चाची ४२०’ हा चित्रपट नक्कीच अनेकदा पहिला असेल. कमल हसन यांनी साकारलेली ‘चाची’ ही किती देखणी आहे याची प्रचीती आपल्याला आलीच आहे. याच देखण्या कमल हसनला देखणी व आकर्षक ‘चाची’ करण्याचे १००% श्रेय हे त्या रंगभूषाकाराला आहे.

आपण महाराष्ट्रातील ‘जोगवा’ हा लोकनृत्याचा प्रकार अनेकदा पाहिला आहे. नवरात्र असल्यामुळे आवर्जून हे उदाहरण सांगावेसे वाटते. कपाळावर भंडारा लावून अथवा मळवट भरून, जिभेला लाल रंग लावून केस मोकळे सोडून साकारलेली ‘अंबाबाई’ रंगभूषेचे एक उत्तम उदाहरण ठरू शकते. हे देवी लोकांच्या मनावर ठसण्यासाठी विविध गडद रंगांचा सढळ हस्ते वापर केला जातो.

खरंतर ‘नाट्याची-नृत्याची रंगभूषा’ या विषयाचा आवाका मोठा आहे. कारण त्यामध्ये खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार केला जातो. शास्त्रीय नृत्य असो अथवा प्रादेशिक लोकनृत्य असो, प्रत्येक नाटय व नृत्यशैलीप्रमाणे त्या त्या नाटय व नृत्याची रंगभूषा बदलते. लोकनृत्यामध्ये प्रादेशिक, भौगोलिक, सांस्कृतिक पाश्र्वभूमीनुसार रंगभूषा ही बदलत जाते. प्रत्येक नट,नटीला, नर्तकाला तसेच नर्तकीला स्वतःचा मेकअप करता यायला हवा.

संदर्भ:- केळकर यशवंत- 'नाटय निर्मिती', परिमल प्रकाशन, औरंगाबाद.1982.

रंगभूषाकार

[संपादन]