Jump to content

मराठी नाट्यलेखनाचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मराठी नाट्यलेखन या पानावरून पुनर्निर्देशित)

१८४३ मध्ये विष्णूदास भावे यांच्या "सीतास्वयंवर" या मराठी नाटकाचा प्रयोग झाला मराठी नाट्य वाङमयाचा उदय म्हणून या नाटकाकडे पाहिले जाते. १८५५ मध्ये महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे आशय-विषय आणि भाषा अभिव्यक्ती या सर्व बाबतीत एक स्वतंत्र नाटक लिहिले. त्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांच्या १८८० च्या संगीत शाकुंतल या नाटकापासून मराठी रंगभूमीवर संगीत नाट्य पद्धतीचा नवा संप्रदाय उदयास आला. इंग्रजीतील ऑपेरा या नाट्य प्रकाराच्या धर्तीवर किर्लोस्करांनी मराठी नाट्य संगीत शाकुंतलच्या रूपाने एक वेगळा प्रकार सुरू केला. शाकुंतल हे भाषांतरित नाटक आहे. त्यानंतर त्यांनी महाभारतातील सुभद्राहरणाची कथा आणि मोरोपंत तद्विषयक आख्यान यांचा आधार घेऊन संगीत सौभद्र हे स्वतंत्र नाटक लिहिले.[ संदर्भ हवा ]