मनोगत (संकेतस्थळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मनोगत या पानावरून पुनर्निर्देशित)

मनोगत हे युनिकोड वापरून तयार केलेले मराठी भाषेतले एक संकेतस्थळ आहे. मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा असलेल्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी ' , आणि आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी एक संकेतस्थळ उपलब्ध करून देणे हा मनोगतकारांचा हेतु आहे. मनोगतचे सदस्य सामान्यतः "मनोगती" या नावाने ओळखले जातात. मनोगतची सध्याची नोंदणीकृत सदस्यसंख्या ३५००हून अधिक आहे. मात्र त्यातले सगळे सदस्य कार्यरत नाहीत. एकाच मनोगतीचे एकाहून अधिक नावांनी सदस्यत्व असल्याचे मनोगतला पुष्कळदा आढळते.

मनोगतवरील इतर तांत्रिक माहिती[संपादन]

आस्की[संपादन]

आस्की ही एक संगणकात वापरण्यासाठी टंक बनविण्याची पद्धत आहे. यामध्ये शिवाजी १,२ आणि ५, किरण, श्री लिपी, C-DACचे i-leap टंक.. असे प्रकार मोडतात. हे टंक विंडोज ९८, XP, २००० अशा कुठल्याही कार्यप्रणालीवर चालतात. कारण ते त्या त्या विशिष्ट कंपनीच्या मालकीचे असतात. युनिकोड ही आस्कीहून वेगळी पद्धत आहे.

युनिकोड[संपादन]

मनोगत हे युनिकोड वापरून तयार केलेले संकेतस्थळ आहे. फक्त विंडोज २००० व त्याहून प्रगत कार्यप्रणाली युनिकोड जाणू शकतात. विंडोज ९८ मध्ये युनिकोड वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्टने 'Hook API' ही संकल्पना विकसित केली आहे. भारतामध्ये भारतीय भाषांवर काम सी-डॅक व मॉड्युलर या प्रमुख संस्था आहेत. युनिकोड मानके (स्टॅंडर्ड्‌स) ठरवण्याचे काम ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर चालणारी युनिकोड कन्सॉर्टियम ही संस्था करते.

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

मनोगत

युनिकोड

हेसुद्धा पहा[संपादन]