भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयआयआयटी पुणे बॉईज वसतिगृह

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, पुणे (आयआयआयटीपी) भारतीय माहिती तंत्रज्ञानातील भारतीय शिक्षण संस्थांपैकी एक आहे, माहिती तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणाऱ्या भारतातील उच्च शिक्षण संस्थाचा एक गट आहे. याची स्थापना २०१६ साली झाली होती. याची स्थापना भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने केली आहे. एका वर्षात सुमारे ४०० विद्यार्थी या महाविद्यालयातून शिक्षण घेतात. अनुपम शुक्ला आयआयआयटीपीचे संचालक आहेत.सन २०१६ मध्ये हे महाविद्यालय स्थापन झाल्यामुळे त्याची पहिली तुकडी सन २०२० मध्ये पास होईल.[१][२]

स्थान[संपादन]

आयआयआयटीपी हे पुणे, महाराष्ट्रात असून जुलै २०१६ पासून या शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली. या महाविद्यालयाचा परिसर बोपदेव घाट, कोंढवा अनेक्सी, येवलेवाडी, पुणे येथे आहे. हे महाविद्यालय पुणे रेल्वे स्थानकापासून १५ कि.मी. अंतरावर आहेपुणे, बोसदेव घाट, येवलेवाडी, पिसोली, पुणे या सुंदर पायथ्याशी असलेल्या केजेईआयच्या ट्रिनिटी कॅडमी ऑफ इंजिनीअरिंगच्या तात्पुरत्या परिसरातून ही संस्था कार्यरत आहे.हे पुणे विमानतळापासून २१ कि.मी. अंतरावर असून कात्रज बस स्टँडपासून ४.४ किमी अंतरावर आहे.[३]

स्थापना[संपादन]

आयआयटीपीला भारत सरकारच्या (जीओआय) मानव संसाधन विकास मंत्रालयाने (एमएचआरडी) मान्यता दिली. आयआयआयटीपी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर स्थापन केली गेली आहे. पन्नास टक्के पदे एमएचआरडीकडे आहेत तर 35 टक्के हिस्सा महाराष्ट्र सरकारकडे आहे; बाकीचे उद्योग रोल्टा आणि हबटाउन लिमिटेड यांच्याकडे आहेत.

शैक्षणिक[संपादन]

आयआयटी पुणे बीटेक संगणक विज्ञान व अभियांत्रिकी (सीएसई), आणि बीटेक इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन अभियांत्रिकी (ईसीई) हे दोन अभ्यासक्रम उपलब्ध करते ज्यामध्ये सीएसईमध्ये १५० विद्यार्थी आणि ईसीईमधील ७५ विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या महाविद्यालयातील प्रवेश संयुक्त सीट वाटप प्राधिकरण (जोएसएए)च्या माध्यमातून घेतले जाते.

बाह्य साइट[संपादन]

आयआयटीपी वेबसाइट

संदर्भ[संपादन]

  1. ^ "IIIT Pune degree to now offer US, European university validity". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-01-16. 2020-07-03 रोजी पाहिले.
  2. ^ May 21, Pune Mirror / Updated:; 2015; Ist, 02:30. "Dreaming of IIT, IIMs, Pune gets IIIT instead". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-07-03. 2020-07-03 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ josaa.nic.in https://josaa.nic.in/seatinfo/root/InstProfile.aspx?instcd=321. 2020-07-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)