भारतीय मानक ब्यूरो
Appearance
(भारतीय मानक संघटना या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय मानक ब्यूरो (इंग्लिश: Bureau of Indian Standards; संक्षेप: BIS) ही भारत देशामधील प्रमाणे ठरवणारी एक सरकारी संस्था आहे. भारत सरकारच्या अखत्यारीखालील ही संस्था २३ डिसेंबर १९८६ रोजी स्थापन झाली. ही संस्था आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. हिचे जुने नाव भारतीय मानक संस्था (Indian Standards Institution) असे होते.