भगवानबाबा (दूरचित्रवाहिनी मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भगवानबाबा
प्रकार मालिका
दिग्दर्शक सतीश परदेशी
निर्माता रमेश स्स्ते
निर्मिती संस्था द टायगर फिल्म्स ॲन्ड एन्टरटेनमेंट, पुणे
कलाकार डॉ.विलास उजवणे, प्रकाश धोत्रे, राघवेंद्र कडकोळ, रवी पटवर्धन, वृंदा बाळ, पोपट चव्हाण, निकिता कुलकर्णी, सीमा पिसे, महेश शेजवळ
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २०
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ ३० मिनिटे
प्रसारण माहिती
वाहिनी साधना
पहिला भाग ३ ऑक्टोबर, २०१२
प्रथम प्रसारण ३ ऑक्टोबर, २०१२

भगवानबाबा ही राजयोगी महंत श्री संत भगवानबाबा यांच्या चरित्रावर आधारीत साधना या आध्यात्मिक वाहिनीवरून प्रक्षेपित केली जाणारी दूरचित्रवाहिनी मालिका आहे. तिचे प्रक्षेपण दिनांक ३ ऑक्टोबर, इ.स. २०१२ पासून चालू केले जाणार आहे. या मालिकेचे पहिल्या २० भागांचे चित्रिकरण पूर्ण झाले असून डॉ.विलास उजवणे हे भगवानबाबांच्या भूमिकेत काम करत आहेत. सतीश परदेशी हे या मालिकेचे दिग्दर्शक असून पुणे येथील द टायगर फिल्म्स ॲन्ड एन्टरटेनमेंटतर्फे रमेश स्स्ते यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेमुळे संत भगवानबाबा यांचे आध्यात्मिक व सामाजिक जीवन प्रथमच छोट्या पडद्यावर येणार आहे.

कलाकार[संपादन]

विलास उजवणे यांच्याबरोबरच प्रकाश धोत्रे, राघवेंद्र कडकोळ, रवी पटवर्धन, वृंदा बाळ, पोपट चव्हाण, निकिता कुलकर्णी, सीमा पिसे, महेश शेजवळ हे कलाकारही या मालिकेत काम करत आहेत.