भक्ति यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉक्टर दादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भक्ति यादव (जन्म : महीदपूर, उज्जैन जिल्हा, ३ एप्रिल, १९२६; मृत्यू : इंदूर, १४ ऑगस्ट, २०१७) या भारतातील एक समाजसेवी डॉक्टर होत्या. १९४८ साली त्या एम.बी.बी.एस. झाल्या. इंदूरमधून ही परीक्षा पास होणाऱ्या त्या पहिल्या होत्या. त्यांच्या रुग्णालयात गरिबांना मोफत उपचार मिळत असत. डॉ. दादी यांनी आयुष्यभरात स्त्रियांची एक लाखाहून अधिक बाळंतपणे केली.

डॉक्टर यादव प्राथमिक शिक्षण गारोथ गावात झाले. आपल्या मामाकडे राहून त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण इंदूरच्या अहिल्या आश्रम शाळेतून पूर्ण केले. इंदूरला महात्मा गांधी मेमोरिअल मेडिकल कॉलेज नुकतेच सुरू झाले होते. त्याच्या पहिल्या बॅचमधून त्या एम.बी.बी.एस. झाल्या. त्या बॅचमध्य त्या एकुलत्या एक स्त्री-विद्यार्थी होत्या.

डॉक्टर झाल्यावर त्यांनी सरकारी इस्पितळात काम करण्याऐवजी, गिरणी कामगारांच्या गरीब स्त्रियांसाठी असलेल्या नंदलाल भंडारी प्रसूतिगृहात नोकरी धरली. ही नोकरी त्यांनी अनेक दशके केली. नोकरीतून मुक्त झाल्यावर त्यांनी इंदूरच्या परदेशीपुरा भागात स्वतःचे 'वात्सल्य' नावाचे प्रसूतिगृह काढले. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी एकूण ६८ वर्षे काम केले. त्यांच्या प्रसूतिगृहातून बाळंत होण्यासाठी मध्य प्रदेशातूनच नव्हे तर, गुजराथ-राजस्थानातील दूरदूरच्या गावांतून बायका येत असत. आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे वयाच्या ९१व्या वर्षापर्यंत त्या कार्यरत राहिल्या.

रुग्णांना अत्यंत प्रेमाने हाताळणाऱ्या डॉ. दादींनी मूलबाळ होत नसलेल्या अनेक स्त्रियांना अपत्यप्राप्ती करून दिली.

मृत्यूपूर्वी दोन महिने आधी त्यानी पडल्या, त्यांना फ्रॅक्चर झाले आणि अंथरुणावर खिळून रहावे लागले. तरीही अन्य डॉक्टर त्यांच्या सल्ल्यासाठी येतच राहिले. अशातच त्यांचा अंत झाला.

पुरस्कार[संपादन]

  • पद्मश्री (२०१७)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.