ब्रॉडवे, न्यू यॉर्क
Jump to navigation
Jump to search
ब्रॉडवे हा न्यू यॉर्क शहरातील मॅनहॅटन भागातील प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याभोवती ५०० किंवा अधिक प्रेक्षकांची सोय असलेली सुमारे ४० नाट्यगृहे आहेत. हा रस्ता बोलिंग ग्रीन उद्यानापाशी स्टेट स्ट्रीटपासून सुरू होतो आणि मॅनहॅटनमधून २१ किमी साधारण उत्तरेस धावतो. पुढे ३.२ किमी ब्रॉंक्समधून जात ह रस्ता शहराबाहेर पडतो व यॉंकर्स, हेस्टिंग्स-ऑन-हडसन, डॉब्स फेरी, अर्विंग्टन आणि टॅरीटाउन उपनगरांतून जात वेस्टचेस्टर काउंटीतील स्लीपी हॉलो या गावात संपतो.
न्यू यॉर्क शहरात ब्रॉडवे नावाचे इतर चार रस्ते आहेत. हे ब्रूकलिन, स्टॅटन आयलंड आणि क्वीन्समध्ये (२) आहेत.