Jump to content

ब्रेकेनरिज (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रेकेनरिज, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रेकेनरिजमधील मुख्य रस्ता

ब्रेकेनरिज शहर हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. होमरुल नगरपालिका असलेले हे शहर समिट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. हे शहर नगरपालिका पातळीवरचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. [] २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५,०७८. हे शहर टेनमाइल रेंज या पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले आहे.

फर्नकॉम्ब हिल, ब्रेकनरिज येथे सापडलेला सोन्याचा नमुना

१९६१ मध्ये ब्रेकेनरिज जवळ पहिल्यांना स्की वाटा तयार करण्यात आल्या. तेव्हापासून ब्रेकनरिज स्की रिसॉर्टमुळे हे शहर स्की करणाऱ्यांमध्ये एक प्रिय गंतव्यस्थान झाले आहे. येथे उन्हाळ्यात डोंगरवाटा, रानफुले, फ्लाय-फिशिंग, डोंगरी सायकलिंग, तळ्यातील नौकानयन, व्हाइट वॉटर राफ्टिंग, इ. अनेक आकर्षणे प्रवाशांना खेचतात. शहरात अनेक दुकाने आणि रेस्टॉरंट्सही येथे प्रवासी आणतात. १९८१पासून सप्टेंबरमध्ये येथे ब्रेकेनरिज चित्रपट महोत्सव भरवला जातो. [] [] याशिवाय २००० च्या सुमारापासून दरवर्षी जानेवारीमध्ये बॅककंट्री चित्रपट महोत्सव होतो. [] याच वेळी नॉर्स देव उल्लरच्या नावची जत्राही येथे असते. []

ब्रेकेनरिज शहराची स्थापना नोव्हेंबर १८५९ मध्ये झाली. या शहराला थॉमस ब्रेकेनरिज या सोनेशोधकाचे नाव देण्यात आले आहे. १८६० मध्ये, जनरल जॉर्ज ई. स्पेन्सर याने शहरात टपाल कार्यालय सुरू होईल या अदमासाने शहराचे नाव तत्कालीन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जॉन कॅबेल ब्रेकिन्रिज यांच्या नावे शहराच्या नावाचे शुद्धलेख बदलून ब्रेकिन्रिज असे केले. हा बदल कामास येऊन ब्रेकिन्रिज पोस्ट ऑफिस हे कॉन्टिनेंटल डिव्हाइड आणि सॉल्ट लेक सिटी दरम्यानचे एकमेव पोस्ट ऑफिस झाले. [] १८६१ मध्ये जेव्हा ब्रेकिन्रिज कॉन्फेडरेट स्टेट्स आर्मीमध्ये ब्रिगेडियर जनरल म्हणून दाखल झाला तेव्हा शहराने आपले नाव लगेच बदलून मूळचे असे ब्रेकेनरिज केले. []

ब्रेकेनरिजच्या परिसराचे वसंतातील दृष्य

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "37th Annual Breckenridge Film Festival". Without A Box. 2019-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 4, 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "About the Breck Film Fest". March 4, 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Backcountry Film Festival returns Jan. 21 to Breckenridge". Summit Daily. Summit County, Colorado. January 11, 2017. March 4, 2017 रोजी पाहिले.
  5. ^ Donnell, Mackenzie (December 19, 2016). "Ullr Fest in Breckenridge". Best of Breckenridge. 2022-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 4, 2017 रोजी पाहिले.
  6. ^ Dawson, John Frank (1954). "Breckenridge". Place Names in Colorado: Why 700 Communities Were So Named. p. 11. 16 March 2020 रोजी पाहिले.
  7. ^ "Town History, Gold Dust to White Gold". Special Features. Town of Breckenridge. 2007-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-02-23 रोजी पाहिले.