बॅप्स श्री स्वामीनारायण मंदिर लंडन
बॅप्स श्री स्वामीनारायण मंदिर तथा नीस्डेन मंदिर किंवा नीस्डेन टेंपल हे इंग्लंडच्या लंडन शहरातील नीस्डेन भागातील एक हिंदू मंदिर आहे. संपूर्णपणे पारंपारिक पद्धती आणि साहित्य वापरून बांधलेले हे मंदिर हे ब्रिटनचे पहिले अस्सल हिंदू मंदिर समजले जाते. [१] इतर धर्माच्या प्रार्थनास्थळांमधून रूपांतरित केल्या गेलेल्या मंदिरांपेक्षा वेगळे असे हे युरोपातील पहिले पारंपरिक हिंदू दगडी मंदिर होते. या मंदिराची मालकी व व्यवस्थापन बोचासणवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बॅप्स) कडे आहे. या मंदिराचे उद्घाटन १९९५ मध्ये प्रमुख स्वामी महाराजांनी केले होते. मंदिर संकुलात अंडरस्टँडिंग हिंदूइझम नावाचे कायमस्वरूपी प्रदर्शन आणि असेंब्ली हॉल, व्यायामशाळा, पुस्तकांची दुकाने आणि कार्यालये असलेले सांस्कृतिक केंद्र देखील आहे.
हे मंदिर प्रमुख स्वामी रोड नीस्डेन लंडन NW10 8HW, युनायटेड किंग्डम येथे आहे.